NEET UG 2021 परीक्षा रद्द करुन पुन्हा घेण्यासाठी उमेदवारांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

UG 2021: राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (NTA)द्वारे १२ सप्टेंबर २०२१ रोजी नियोजित राष्ट्रीय पात्रता परीक्षा (अंडर ग्रॅज्युएट) म्हणजेच नीट यूजी २०२१ रद्द करुन पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी उमेदवारांनी केली आहे. यासाठी उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. नीट यूजी २०२१ परीक्षेत सहभागी १३ उमेदवारांनी वकील ममता शर्मा यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेत राजस्थान आणि उत्तर प्रदेशातील परीक्षेच्या पेपर लीकची कथित प्रकरणे आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो अर्थात सीबीआय तथ्य शोध अहवाल लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाची विनंती करण्यात आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, NEET परीक्षेत बनावट उमेदवारांना सामील करून आणि विविध कोचिंग सेंटर आणि पेपर सोडवणाऱ्या टोळ्यांकडून प्रत्येक उमेदवाराकडून ५० लाखांची वसूली केल्याच्या आरोपाखाली सीबीआयने चार जण आणि इतर अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर नोंदवला आहे. सीबीआयने नोंदवलेला एफआयआरमुळे मोठ्या कोचिंग सेंटर आणि पेपर सोडवणाऱ्या टोळ्यांचा हस्तक्षेप स्पष्ट होत आहे. गुन्हेगारी कट रचून परीक्षेचा पेपर फोडण्यात आला असे नीट यूजी २०२१ परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. सीबीआयच नव्हे तर राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यांच्या पोलिसांनीही नीट यूजी २०२१ प्रवेश परीक्षेच्या पेपर लीकच्या कथित प्रकरणांमध्ये एफआयआर नोंदवला असल्याचेही याचिकाकर्त्यांनी म्हटले. ही सर्व प्रकरणे पाहता, फसव्या माध्यमांचा वापर आणि अन्यायकारक पद्धती राष्ट्रीय चाचणी एजन्सीच्या NEET UG 2021 परीक्षेत निष्पक्षतेबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यामुळे ही परीक्षा रद्द करुन पुन्हा घेण्यात यावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. शिक्षण मंत्रालय, राष्ट्रीय परीक्षा एजन्सी आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग यांना कॉपी आणि बायोमेट्रिक चाचणी, नेटवर्क जॅमर यांच्यामधील अनियमितता रोखण्यासाठी उपाययोजना करून सुरक्षा मानके सुधारण्याचे आदेश देण्यात यावेत असेही याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/39LCyke
via IFTTT

Post a Comment

0 Comments