Also visit www.atgnews.com
TET 2021: शिक्षक पात्रता परीक्षा आता ३० ऑक्टोबरला
म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्यातील शिक्षकांसाठी आयोजित केली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षेच्या () वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाची परीक्षा ३१ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आल्याने 'टीईटी' परीक्षा एक दिवस आधी म्हणजेच ३० ऑक्टोबरला होणार आहे. आरोग्य विभागाच्या एकूण सहा हजार २०५ पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या तारखा नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार गट 'क' पदांसाठीची परीक्षा २४ ऑक्टोबर रोजी आणि आणि गट 'ड' पदांसाठीची परीक्षा ३१ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र, ३१ ऑक्टोबर रोजी होणार होती. 'टीईटी' आणि आरोग्य विभागाची परीक्षा एकाच दिवशी आल्याने सरकारी यंत्रणांचा सावळागोंधळ पुन्हा एकदा सर्वांसमोर आला. या तारखांवरून संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर आता 'टीईटी'ची परीक्षा ३१ ऑक्टोबरऐवजी ३० ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले. गेल्या आठवड्यामध्ये आरोग्य विभागाच्या परीक्षेवरून राज्यात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. परीक्षेच्या एक दिवस आधी अचानक परीक्षा रद्द करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले होते. परीक्षा परिषदेनेही यापूर्वी आठ ऑक्टोबरला होणाऱ्या 'टीईटी'चे वेळापत्रक बदलून परीक्षा ३१ ऑक्टोबरला होणार, असे जाहीर केले होते. आता 'टीईटी'ची तारीख पुन्हा बदलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची प्रशासनावर टीका 'टीईटी' परीक्षेचे वेळापत्रक वारंवार बदलले जात असल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा परिषदेवर टीकेची झोड उठवली आहे. परिषदेकडून आत्तापर्यंत तीन वेळा वेळापत्रक बदलण्यात आले आहे. परीक्षा देणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांचा विचार केला जात नसल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करीत आहेत. यंदा 'टीईटी'साठी ८५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. टीईटी आणि आरोग्य विभागाची परीक्षा एकाच दिवशी येत असल्याचे निदर्शनास आल्याने बुधवारी तातडीने बैठक घेऊन परीक्षा ३० ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल. - तुकाराम सुपे, संचालक, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WoXtXl
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments