Also visit www.atgnews.com
वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्ते पदे लवकरच भरणार
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सांस्कृतिक विभागातील रिक्तपदांबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे. वर्ग ३ आणि वर्ग ४मधील रिक्त पदांच्या भरतीबाबत कालबद्ध आराखडा तयार करण्याची सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्य विभागातील रिक्तपदांबाबत आढावा घेण्यासाठी देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित केली होती. सध्या या दोन्ही विभागातील वर्ग १ आणि वर्ग २ची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येत असून याबाबत कार्यवाही सुरू आहे. मात्र वर्ग ३ आणि वर्ग ४ची रिक्त पदे विभागामार्फत भरण्यात येणार असल्याने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. 'दोन्ही विभागांतील रिक्त पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे. रिक्त पदे भरण्याचा आराखडा तयार करण्यात यावा. विभाग पदे भरीत असताना परीक्षा घेण्यासाठी कोणत्या संस्थेची निवड, कशा पद्धतीने करण्यात येणार, ज्या पदांची भरती करण्यात येणार आहे, त्या पदांचे भरती नियम याबाबत सर्व नियोजन करण्यात यावे. तसेच विभागाचा आढावा घेताना पदोन्नती, विभागाचा आकृतीबंध या सगळ्या बाबी तपासून घ्यावेत', अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ZyY2zg
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments