Also visit www.atgnews.com
इग्नूतर्फे डिसेंबर टीईई २०२१ साठी असाइनमेंट जमा करण्याला मुदतवाढ
December 2021: इंदिरा गांधी नेशनल ओपन युनिव्हर्सिटी (Indira Gandhi National Open University)ने असाइनमेंट ( Assignment)जमा करण्याच्या तारखेला मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना आता ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत असाइनमेंट जमा करता येणार आहे. डिसेंबर २०२१ ला टर्म एंड परीक्षेसाठी उपस्थित राहणारे विद्यार्थी अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर अधिक माहिती मिळवू शकतात. याआधी असाइनमेंट जमा करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत होती. युनिव्हर्सिटी ने डिसेंबर २०२१ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ही परीक्षा २० जानेवारी २०२२ पासून सुरू होणार आणि २२ फेब्रुवारी २०२२ रोजी संपेल. डिसेंबर २०२१ टर्म-एंड परीक्षेसाठी परीक्षा फॉर्म ऑनलाइन जमा करण्यासाठी पोर्टल सुरु करण्यात येणार आहे. परीक्षा ऑफलाइन माध्यमातून होणार आहे. महत्वाच्या तारखा डिसेंबर TEE साठी परीक्षेची सुरुवात - २० जानेवारी २०२२(तात्पुरती) डिसेंबर TEE परीक्षेची अंतिम तारीख - २२ फेब्रुवारी २०२२ (तात्पुरती) तक्रार दाखल करण्याची शेवटची तारीख - १० नोव्हेंबर २०२१ इग्नू बद्दल इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची (IGNOU) स्थापना १९८५ मध्ये करण्यात आली आहे. मुक्त आणि दूरस्थ शिक्षणाच्या क्षेत्रात इग्नूची स्वतःची ओळख आहे. इग्नूने आपल्या स्थापनेपासून देशातील उच्च शिक्षणात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. युनेस्कोच्या मते, हे देशातील सर्वात मोठे दूरस्थ विद्यापीठ आहे. IGNOU त्याच्या मुख्यालयात आणि प्रादेशिक केंद्रांवर ४२० प्राध्यापक सदस्य आणि उच्च शिक्षण, व्यावसायिक संघटना आणि उद्योगातील परस्पर संस्थांमधून सुमारे ३६ हजार मार्गदर्शकांच्या मदतीने साधारण ४९० प्रमाणपत्र, डिप्लोमा, पदवी आणि डॉक्टरेट कार्यक्रम आयोजित करते.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jPr4BL
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments