सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस शिपाई पद भरतीसाठी १३ ऑक्टोबरला परीक्षा

सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील २० चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची लेखी परीक्षा १३ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. अर्ज केलेल्या परीक्षार्थींनी https://ift.tt/3lmstRL या पोर्टलवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याचे प्रभारी पोलीस उप अधीक्षक यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील २० चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीसाठीची परीक्षा १३ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ हायस्कुल आणि बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज ही परीक्षा केंद्रावर होणार आहे. लेखी परीक्षेकरिता प्रवेशपत्रावर नमुद असलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर ओळखपत्रासह वेळेत उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत १८००२१००३०९, पोलीस भरती मदत केंद्र कक्ष ०२३६२-२२८००८/ सिंधुदुर्ग पोलीस नियंत्रण कक्ष – ०२३६२२२८६१४ आणि bhartimahapolice@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधावा, असेही एस. बी. गावडे प्रभारी पोलीस उप अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी कळविले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mAZBV1
via IFTTT

Post a Comment

0 Comments