CAG Recruitment 2021: कॅगमध्ये विविध पदांवर भरती, बारावी उत्तीर्णांनाही संधी

2021: कंप्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया (CAG)मध्ये सरकारी नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारताची सर्वोच्च लेखापरीक्षण संस्था, भारताचे नियंत्रक- महालेखापरीक्षक म्हणजेच कॅगने देशातील विविध राज्यांतील विविध कार्यालयातील ग्रुप सी पदांवरील भरतीसाठी जाहिरात दिली आहे. ऑडिटर, अकाउंटंट, क्लर्क, डीईओ-ग्रेड ए च्या एकूण १९९ पदांसाठी क्रीडा कोट्यातून ही भरती करण्यात येणार आहेत. इच्छुक उम्मीदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत ऑफलाइन मोड मध्ये अर्ज करू शकतात. जाहिरातीची दिनांक २ ऑक्टोबर २०२१ आहे. भारताचे नियंत्रक- महालेखापरीक्षक (CAG) ने देशातील विविध नोडल ऑफिसमधील रिक्त पदांसाठी कोणत्या क्रीडा कोट्यांतर्गंत पुरुष किंवा महिला उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे, त्याची संपूर्ण यादी जाहीरातीत दिली आहे. अधिकृत वेबसाइट cag.gov.in वर होमपेज वर ‘whats new’मध्ये दिलेली लिंक किंवा या वृत्तात दिलेल्या थेट लिंकद्वारे जाहिरात डाऊनलोड करता येईल. सीएजी भरती 2021 साठी अर्ज कसा करावा? अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार सीएजीच्या वेबसाइट वर दिलेल्या लिंक किंवा खाली दिलेल्या डायरेक्ट लिंकच्या माध्यमातून अॅप्लिकेशन फॉर्म डाऊनलोड करू शकतात. उमेदवारांना या अॅप्लिकेशन पूर्ण भरून विचारलेल्या कागदपत्रांसह संबंधित नोडल ऑफिसमध्ये रजिस्टर्ड किंवा स्पीड किंवा ऑर्डिनरी पोस्टच्या माध्यमातून किंवा स्व:त जाऊन जमा करायचा आहे. सीएजी भरती 2021 साठी आवश्यक शैक्षणिक योग्यता ऑडिटर / अकाउंटंट पदांसाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा उच्च शिक्षण संस्थेतून पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे. क्लर्क / डीईओ ग्रेड ए पदांसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी किंवा समकक्ष उत्तीर्ण आवश्यक आहे. सर्व पदांसाठी उमेदवारांचे वय अखेरच्या तारखेला १८ वर्षांपेक्षा कमी आमि २७ वर्षांपेक्षा अधिक नसावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3D4urfs
via IFTTT

Post a Comment

0 Comments