DFCCIL मध्ये १०७४ पदांची भरती; परीक्षेची उत्तरतालिका जाहीर

Recruitment 2021: रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडतर्फे (DFCCIL) भरतीसाठी परीक्षा संपन्न झाली. या निवड प्रक्रियेअंतर्गत विविध विभागांमध्ये १०७४ ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह, एक्झिक्युटिव्हआणि ज्युनिअर मॅनेजर पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (सीबीटी) परीक्षेची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. DFCCIL लेखी परीक्षेला बसलेले उमेदवार महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन उत्तरतालिका डाऊनलोड करु शकतात. बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे. DFCCIL कडून २८ ते ३० सप्टेंबर २०२१ दरम्यान CBT चे आयोजन करण्यात आले होते. DFCCIL Answer Key: अशी करा डाऊनलोड DFCCIL लेखी परीक्षेची उत्तरतालिता डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जा. होमपेजवरील करिअर सेक्शनवर क्लिक करा. त्यानंतर दिलेल्या ओपन मार्केट रिक्रूटमेंट या लिंकवर क्लिक करा. यानंतर नवीन पेजवर, संबंधित भरती जाहिरात क्रमांक क्र. ०४/२०२१ सह दिलेल्या आक्षेपाच्या लिंकवर क्लिक करा. यानंतर उत्तर तालिका जाहीर करण्यासंबंधित नोटीस दिसेल. ज्यामध्ये उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदविण्यासंदर्भात लिंक दिसेल. त्यावर क्लिक करा. नव्या पेजवर आपला युजर आयडी आणि पासवर्डने भरून उमेदवार उत्तर तालिका डाउनलोड करू शकतात. यावर काही आक्षेप असल्यास नोंदवू शकतात. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने आक्षेप नोंदविण्यासाठी ९ ऑक्टोबर २०२१ रात्री ११.४५ वाजेपर्यंत वेळ दिला आहे. उमेदवारांना उत्तरतालिकेविषयी काही प्रश्न असल्यास ते कंपनीने जाहीर केलेल्या ईमेल आयडी dfccil.examhelpdesk2021@gmail.com वर मेल करू शकतात.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2YuDojn
via IFTTT

Post a Comment

0 Comments