IBPS RRB Result: ऑफिसर, ऑफिस असिस्टंट भरतीची प्रोव्हिजनल अलॉटमेंट यादी जाहीर

IBPS RRB Result 2021: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनेल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection) ने ऑफिसर (Scale 1, 2, 3) आणि ऑफिस असिस्टंट (Multipurpose) प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट जारी केली आहे. ग्रामीक्ष क्षेत्रातील बँक भरतीसाठी असणाऱ्या अधिकृत वेबसाइट @ibps.in वर ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, ते आता दोन्ही पदांसाठी लिस्ट आवश्यक माहिती भरून चेक करू शकतात. उमेदवारांनी ध्यानात घ्यावे की आयबीपीएस ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल रिजल्ट 2021 डाऊनलोड करण्याची सुविधा २९ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर २०२१ पर्यंत उपलब्ध राहील. या मुदतीनंतर निकालाची लिंक हटवण्यात येईल. IBPS RRB Result 2021: पुढील पद्धतीने पाहा निकाल सर्वात आधी उमेदवारांनी आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटibps.in वर जावे. यानंतर होमपेज वर दिसणाऱ्या सीआरपी आरआरबी IX ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल १ साठी आपला निकाल पाहण्यासाठी 'येथे क्लिक करा' या लिंकवर क्लिक करा. आता तुम्ही लॉगिन बटन वर जाल. रजिस्ट्रेशन नंबर / रोल नंबर, पासवर्ड, कॅप्चा कोड नोंदवा आणि लॉगिन बटणावर क्लिक करा. निकाल समोर दिसेल. यानंतर आयबीपीएस ऑफिस असिस्टंट आणि ऑफिस स्केल १२, ३ निकाल २०२१ डाऊनलोड करून भविष्यातील संदर्भासाठी ठेवा. नोटिसनुसार ही प्रोव्हिजनल अलॉटमेंट लिस्ट आरक्षण धोरणावर केंद्र सरकारद्वारे वेळोवेळी जारी केलेल्या विविध दिशानिर्देशांनुसार तयार केली आहे. यापूर्वीही आयबीपीएसने क्षेत्रीय ग्रामीण बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर भरती (IBPS RRB PO Jobs)साठी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. हा निकालही अधिकृत वेबसाइटवर जारी केला गेला होता. निकालाची लिंक १९ नोव्हेंबर २०२१ पर्यंत सक्रीय असेल. परीक्षेसंबंधी अधिक माहितीसाठी उमेदवारांनी वेबसाइटला भेट द्यावी.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bn9NLR
via IFTTT

Post a Comment

0 Comments