Also visit www.atgnews.com
रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीमध्ये विविध पदांची भरती, 'येथे' करा अर्ज
RLDA 2021: (RLDA) द्वारे प्रोजेक्ट सिव्हिल इंजिनीअरच्या पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. नोटिफिकेशननुसार प्रोजेक्ट इंजिनीर पदासाठी पात्र उमेदवारांची निवड गेट परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाणार आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार, अनुभव यांचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. यासाठी उमेदवारांनी ऑफलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. रेल लँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने जाहीर केलेल्या या रिक्त पदांद्वारे () एकूण ४५ पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार RLDA च्या अधिकृत वेबसाइट rlda.indianrailways.gov.in वर जाऊन अर्ज डाउनलोड करू शकतात. याप्रमाणे करा अर्ज या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम RLDA वेबसाइटवर जा आणि अर्ज डाउनलोड करा. अर्जामध्ये विचारलेले तपशील भरल्यानंतर, आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म ईमेल आयडी psecontract@gmail.com वर पाठवा. RLDA सहाय्यक प्रकल्प अभियंता भरतीसाठी उमेदवाराला कंपनीच्या वेबसाइटवरून अर्जाचे स्वरूप मिळू शकेल. नोटिफिकेशन पाहण्यासाठी आणि अर्ज डाउनलोड करण्यासाठी बातमीखाली थेट लिंक देण्यात आली आहे. २३ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. निवड प्रक्रिया प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी उमेदवारांची निवड गेट परीक्षेतील गुणांच्या आधारे केली जाणार आहे. असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनीअर ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार आहे. सुरुवातीला ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल. उमेदवाराच्या कामगिरीचा वार्षिक आढावा आणि कंपनीच्या आवश्यकतेनुसार पुढील मुदतवाढ देण्यात येणार आहे. गेट परीक्षेत दोन उमेदवारांची टक्केवारी समान असल्यास त्यांची निवड वयाच्या आधारे केली जाईल. यामध्ये वयाने मोठ्या असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. तसेच पद निवडीच्या आधारावर निवड केली जाईल. पात्रता आणि वयोमर्यादा RLDA असिस्टंट प्रोजेक्ट इंजिनीअर भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पूर्णवेळ बीई किंवा बीटेक पदवी असणे आवश्यक आहे. बीई किंवा बीटेकमध्ये किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे आणि कमाल २८ वर्षे असणे आवश्यक आहे. नोटिफिकेशनमध्ये अर्जाचा नमुना देण्यात आला आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3IbwS32
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments