अभिनेत्री कंगनाला संविधानाचे प्रशिक्षण देण्याची गरज; उदय सामंत यांच्या कानपिचक्या

अभिनेत्री यांनाच संविधानाचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे, अशी टिप्पणी उच्च व तंत्रशिक्षण विभाग मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी केली. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संविधानाचा अर्थ कळलाच पाहिजे आणि त्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षापर्यंत ठोस पावले उचलण्यात येतील असेही सामंत यांनी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने '' या आयटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीसोबत सामंजस्य करार केला. या कराराची माहिती देण्यासाठी सामंत यांनी ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. या दरम्यान त्यांना संविधानाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी वरील उत्तर दिले. अभिनेत्री कंगना रणौट यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय स्वातंत्र्यलढा आणि संविधानाविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी तिला शालजोडीतले दिले. ते म्हणाले, 'भारतीय संविधान कशा पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं याबाबत आम्ही समिती नेमत आहोत. संविधानाचा समावेश अभ्यासक्रमात करायचा की स्वतंत्रपणे, याबाबत पुढील शैक्षणिक वर्षापासून ठोस निर्णय घेण्यात येईल. भारतीय संविधान हे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येणार आहेत.' इन्फोसिससोबतच्या करारामुळे ४० लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ राज्य सरकारने सोबत शैक्षणिक क्षेत्रासाठी सामंजस्य करार केला आहे. याचा लाभ ४० लाख विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही होणार आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या करारांतर्गत इन्फोसिसद्वारे विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. नागपूरमधील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय आणि दुसरं रत्नागिरी मधील नवीन टेक्निकल कॉलेज या दोन महाविद्यालयात सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर हे प्रशिक्षण दिले जाईल. हा करार पाच वर्षे कालावधीचा आहे. इन्फोसिसच्या सीएसआर प्रोजेक्टअंतर्गत हे प्रशिक्षण दिले जाणार असल्याने विद्यार्थ्यांना ते पूर्णपणे मोफत असेल. दरम्यान, जानेवारी महिन्यात पुण्यात कुलगुरुंची एक परिषद घेऊन त्यांना या प्रकल्पाची माहिती दिली जाणार असल्याचे यावेळी उदय सामंत यांनी सांगितले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rmOMKc
via IFTTT

Post a Comment

0 Comments