Also visit www.atgnews.com
रेल्वेमध्ये १६ हजारहून अधिक पदांची भरती, दहावी, बारावी पास उमेदवारांनी करा अर्ज
Railway Job 2021: रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या माध्यमातून विविध झोनमध्ये अप्रेंटिस पदांवर भरती केली जाणार आहे. यासंदर्भात नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून याची अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे. रेल्वेने विविध झोनसाठी वेगवेगळे नोटिफिकेशन जाहीर केले आहेत. रेल्वे रिक्रूटमेंट सेलने दक्षिण मध्य रेल्वे, पूर्व रेल्वे आणि पश्चिम मध्य रेल्वेसह विविध झोनमध्ये शिकाऊ पदांसाठी भरती (Government job 2021) सुरु केली आहे. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून विविध झोनमध्ये एकूण १६ हजार ५१० पदांची भरती केली जाणार आहे. अप्रेंटिस भरती दक्षिण मध्य रेल्वेने (South Center Railway)अप्रेंटिस पदांसाठी ४ ऑक्टोबर २०२१ पासून अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट scr.indianrailways.gov.in वर जाऊन ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार एकूण ४१०३ पदांची भरती केली जाणार आहे. अधिकृत वेबसाइटवर जाहीर केलेली करण्यात आलेले नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. पूर्व रेल्वे रिक्रूटमेंट सेलने पूर्व रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदासाठी अर्ज मागवले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ४ ऑक्टोबर २०२१ पासून सुरु झाली आहे. या पदांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट www.rrcer.com वर जाऊन ३ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. जाहीर करण्यात आलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण ३३६६ रिक्त जागा भरल्या जातील. पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांची भरती पश्चिम मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांवर (RRC Apprentice 2021) भरती करण्यात आली आहे. ११ ऑक्टोबर २०२१ पासून या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट wcr.indianrailways.gov.in वर १० नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या प्रक्रियेतून एकूण २२२६ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इतर भरती पूर्व मध्य रेल्वेने शिकाऊ उमेदवाराच्या २२०६ रिक्त पदांवर(Government job 2021) अर्ज मागविले आहेत. रेल्वे रिक्रूटमेंट सेल, उत्तर मध्य रेल्वे, प्रयागराज यांनी शिकाऊ पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे आरआरसी एनसीआर भरती अंतर्गत (RRC NCR Recruitment 2021) एकूण १६६४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. पात्रता रेल्वे रिक्रूटमेंट सेलने (RRC) जाहीर केलेल्या नोटीसनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. तसेच उमेदवाराकडे संबंधित स्ट्रीममधील ITI पदवी असणे आवश्यक आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3GIc828
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments