CA Exam December : RTPCR टेस्टविना ऑप्ट आऊटचा पर्याय मागणारी याचिका SC ने फेटाळली

December 2021: डिसेंबरमध्ये होणाऱ्या सीए परीक्षेत लक्षणे नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी आरटी-पीसीआर चाचणीचा आग्रह न धरता 'ऑप्ट आउट' पर्याय उपलब्ध करून देण्याची याचिका फेटाळण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) ला यासंदर्भात निर्देश दिले आहेत. न्यायमूर्ती ए.एम खानविलकर आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसार आम्ही अर्ज विचारात घेण्यास इच्छुक नाही. गरजेनुसार त्यामध्ये सुधारणा करण्यावर अधिकारी विचार करतील" अर्जदारांना नंतरच्या टप्प्यावर कोणतीही तक्रार आल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याची मुभाही दिली आहे. रिट याचिकामध्ये विविध अर्ज दाखल करण्यात आले होते, ती निकाली काढण्यात आल्याचे खंडपीठाचे अध्यक्ष न्या. ए.एम. खानविलकर यांनी यावेळी सांगितले. जून २०२१ पर्यंत स्थिती वेगळी होती आणि वेगळी आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी येथे नाही आहोत असे न्या. खानविलकर यांनी म्हटले. यावर याचिका दाखल करणाऱ्यांकडून नुपूर कुमार यांनी म्हटले,ICAI ने जाहीर केलेल्या ८ नोव्हेंबर २०२१ च्या नवीन नोटिफिकेशनमध्ये कोणतीही अंगभूत यंत्रणा नसली तरी ती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जाहीर केलेली मार्गदर्शक तत्त्वे होती. त्यानुसार तपासणीच्या वेळी किंवा तपासणीदरम्यान लक्षणे आढळतात अशा परीक्षा केंद्रांमधील कोणत्याही व्यक्तीला वैद्यकीय सल्ला मिळेपर्यंत वेगळे ठेवण्यासाठी एक नियुक्त आयसोलेशन कक्ष आवश्यक आहे. न्यायमूर्ती खानविलकर यांनी अर्जावर विचार करण्यास नकार दिला. आम्ही त्याला प्रोत्साहन देऊ शकत नाही. 'हे आता थांबवावे लागेल, तुम्ही एमएच्या माध्यमातून येऊन संपूर्ण कार्यवाही सुरू करू शकत नाही. असे न्या. खानविलकर म्हणाले. डिसेंबर २०२१ सत्राच्या सीए फाऊंडेशन, इंटरमीडिएट आणि फायनल कोर्सेसच्या परीक्षांसाठी 'ऑप्ट आऊट'चा पर्याय आरटीपीसीआर टेस्ट शिवाय दिला जावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. डिसेंबर चार्टड अकाऊंट परीक्षेत विना आरटीपीसीआर टेस्टचा पर्याय विद्यार्थ्यांना मिळावा. यासाठी मेडिकल सर्टिफिकेट देण्याची मुभा असावी असे याचिकेत म्हटले आहे. ICAI ने दिलेल्या परीक्षेच्या दिवशी मार्गदर्शक तत्त्वे आणि धोरणांनुसार, शरीराचे तापमान विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्यास कोणत्याही उमेदवाराला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यास मनाई केली जाईल. अशा परिस्थितीत, उमेदवारांना ७२ तासांच्या आत सकारात्मक RT-PCR अहवाल सादर करणे खूप कठीण होईल असे याचिकेत म्हटले होते. इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (Institute of Chartered Accountants of India, ICAI) च्या ऑफलाइन परीक्षा डिसेंबरमध्ये सुरू होणार आहेत. ICAI ने या परीक्षाचे प्रवेशपत्र जाहीर केले आहे. या परीक्षेलेले उमेदवार आयसीएआयची अधिकृत वेबसाइट icaiexam.icai.org वर जाऊन त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. सीए फाऊंडेशन, इंटरमिजिएट आणि अंतिम परीक्षा ५ ते २० डिसेंबर २०२१ या कालावधीत ऑफलाइन माध्यमातून घेण्यात येणार आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Gd8z3d
via IFTTT

Post a Comment

0 Comments