CAT परीक्षा संपली, IIM सह इतर मॅनेजमेंट इंस्टिट्यूटमध्ये प्रवेश कसा घ्यावा? जाणून घ्या

CAT 2021: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) सह इतर मॅनेजमेंटर संस्थांमधील MBA अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. IIM अहमदाबाद (IIM A) ने रविवार, २८ नोव्हेंबर २०२१ रोजी देशभरात CAT परीक्षा २०२१ आयोजित केली. परीक्षा ३ स्लॉटमध्ये घेण्यात आली. या परीक्षेत बसलेल्या उमेदवारांना यापुढची प्रक्रिया माहिती असणे गरजेचे आहे. CAT परीक्षा संपल्याबरोबर, विविध कोचिंग संस्था आणि तज्ञांनी आपापल्या स्तरावर ची उत्तरतालिका जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. यावरुन उमेदवारांना त्यांच्या गुणांची कल्पना येऊ शकते. तसेच CAT ची अधिकृत उत्तरतालिका IIM अहमदाबाद द्वारे प्रसिद्ध केली जाईल. अहवालानुसार, CAT २०२१ अधिकृत उत्तरतालिका (तात्पुरती) डिसेंबर २०२१ च्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जाईल. CAT 2021 तात्पुरती उत्तरतालिका जाहीर केल्यानंतर उमेदवारांना त्यावर आक्षेप नोंदविण्याची संधी दिली जाईल. परीक्षार्थींना कोणत्याही प्रश्नावर किंवा त्याच्या उत्तरावर आक्षेप असल्यास, उमेदवार पुराव्यासह आयआयएम अहमदाबादकडे तुमचा आक्षेप दाखल करू शकतात. त्यासाठी वेगळे शुल्क भरावे लागेल. त्याचे तपशील उत्तरतालिकेसह प्रसिद्ध केले जातील. त्याच बरोबर कॅट २०२१ ची उत्तरपत्रिका देखील जारी केली जाईल. तात्पुरत्या उत्तर तालिकेवर प्राप्त झालेल्या सर्व आक्षेपांची छाननी केल्यानंतर, IIM अहमदाबाद CAT 2021 अंतिम उत्तरतालिका जाहीर करेल. या आधारे परीक्षार्थींना अंतिम गुण दिले जातील आणि निकाल जाहीर केला जाईल. CAT Result 2021: CAT निकाल कधी ? CAT परीक्षा २०२१ चा निकाल जानेवारी २०२२ च्या पहिल्या आठवड्यात जाहीर होईल. कॅटची अधिकृत वेबसाइट iimcat.ac.in वर उत्तरतालिका आणि निकाल दोन्ही प्रसिद्ध केले जातील. उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक, पासवर्डसह लॉगिन करून त्यांचे स्कोअर कार्ड तपासू शकतील. निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व आयआयएम त्यांचे कट ऑफ जाहीर करतील. यानंतर, ग्रुप डिस्कशन (IIM GD) आणि वैयक्तिक मुलाखत (IIM प्रवेश मुलाखत) वेगवेगळ्या IIM द्वारे आयोजित केले जातील. कट ऑफमध्ये पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचीही जीडी आणि पीआयच्या आधारे टेस्ट घेऊन त्यानंतर प्रवेश दिला जाईल. कॅट पर्सेंटाईल / कॅट स्कोअरच्या आधारावर, उमेदवारांना देशातील इतर अनेक मॅनेजमेंट संस्थांमध्ये देखील प्रवेश मिळवू शकतो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3Effiss
via IFTTT

Post a Comment

0 Comments