Also visit www.atgnews.com
Government job: भारतीय वायुसेनेत विविध पदांची भरती
Recruitment: भारतीय वायुसेनेत नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. इंडियन एअर फोर्स (Indian Air Force,IAF) ने फ्लाइंग ब्रांचतर्फे ग्राउंड ड्युटी (टेक्निकल आणि नॉन टेक्निकल) मध्ये पर्मनंट कमिशन आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनच्या ३१७ पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. IAF द्वारे एम्प्लॉयमेंट न्यूज वीक २७ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२१ मध्ये यासंदर्भात जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार, अर्जाची शेवटची तारीख, अर्ज शुल्क यांचा सविस्तर तपशील जाहिरातीमध्ये देण्यात आला आहे. या पदासाठी उमेदवारांकडून ऑनाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या सर्व पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांची निवड वायुसेनेद्वारे घेण्यात येणार्या एअर फोर्स कॉमन अॅडमिशन टेस्ट (AFCAT) द्वारे केली जाणार आहे. वायुसेनेद्वारे जानेवारी २०२३ पासून सुरू होणार्या अभ्यासक्रमांसाठी AFCAT ०१/२०२२ बॅच आणि NCC स्पेशल एंट्रीने अर्ज आणि निवड प्रक्रीया होणार आहे. अर्ज प्रक्रिया जाणून घ्या हवाई दलाकडून AFCAT ०१/२०२२ बॅच आणि एनसीसी स्पेशल एंट्रीसाठी अर्जाची प्रक्रिया १ डिसेंबरपासून सुरू केली जाणार आहे. उमेदवार AFCAT ची अधिकृत वेबसाइट afcat.cdac.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. ३० डिसेंबर २०२१ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. ऑनलाइन अर्जादरम्यान उमेदवारांना २५० रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल. उमेदवार ऑनलाइन माध्यमातून शुल्क भरायचे आहे. एनसीसी विशेष प्रवेशासाठी कोणतेही परीक्षा शुल्क नसेल. पात्रता निकष एएफसीएटी बॅच ०१/२०२२ हवाई दलाच्या भरतीच्या जाहिरातीनुसार, फ्लाइंग ब्रांचसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय १ जुलै २०२३ रोजी २० वर्षे ते २४ वर्षे असावे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ जुलै १९९९ ते १ जुलै २००३ दरम्यानचा असावा. त्याच वेळी, AFCAT ग्राउंड ड्यूटी शाखेसाठी वयोमर्यादा २० ते २६ वर्षे आहे. दोन्ही प्रकारच्या प्रवेशासाठी, उमेदवारांना हवाई दलाने दिलेल्या वयोमर्यादेच्या अटी तसेच दिलेल्या शैक्षणिक पात्रता आणि शारीरिक निकषांची पूर्तता करावी लागेल. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. उमेदवारांनी दिलेल्या सुचनेनुसारच अर्ज करावा. अर्जात काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3rmHgz1
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments