Government Job: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणात भरती

FSSAI Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणामध्ये (FSSAI) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, अनुभव, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. FSSAI ने अन्न विश्लेषक (Food Analyst), तांत्रिक अधिकारी(Technical Officer), केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी (Central Officer), सहाय्यक व्यवस्थापक ( Assistant Manager), सहाय्यक व्यवस्थापक IT (Assistant Manager IT), हिंदी अनुवादक (Hindi Translator), वैयक्तिक सहाय्यक (Personal Assistant) आणि इतर २३३ पदांसाठी अर्ज मागविले आहेत. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु असून उमेदवारांना १२ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. फूड अॅनालिस्टपदाव्यतरिक्त इतर पदांच्या परीक्षा कॉम्प्युटर माध्यमातून होणार आहेत. टेक्निकलऑफिसर, केंद्रीय खाद्य सुरक्षा अधिकारी आणि सहाय्यक प्रबंधक सारख्या पदांसाठी दोन कॉम्प्युटर आधारित परीक्षा होणार आहेत. इतर पदांसाठी एकच कॉम्प्युटर आधारित परीक्षा होईल. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. नोटिफिकेशनमध्ये पदभरतीचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. रिक्त जागांचा तपशील सहाय्यक संचालक (Assistant Director) सहायक संचालक (तांत्रिक) Assistant Director (Technical) उपव्यवस्थापक (Deputy Manager) फूड अॅनालिस्ट (Food Analyst) टेक्निकल अधिकारी ( Technical Officer) केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी ((Central Food Safety Officer,CFSO) सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) (IT) सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager) सहाय्यक (Assistant) हिंदी अनुवादक (Hindi Translator) स्वीय सहाय्यक (Personal Assistant) आयटी सहाय्यक (IT Assistant) कनिष्ठ सहाय्यक श्रेणी- १ (Junior Assistant Grade- 1) निवड प्रक्रिया उमेदवारांना निवडीच्या सर्व टप्प्यांत मिळालेले गुण हे प्रत्येक टप्प्यासाठी नेमून दिलेल्या वेटेजनुसार अंतिम निवडीसाठी मोजले जाणार आहेत. यापैकी कोणत्याही टप्प्यात उमेदवार गैरहजर असल्यास ते निवडीसाठी पात्र नसतील. यासंदर्भात पुढील माहिती वेळोवेळी अपडेट केली जाईल असे FSSAI ने म्हटले आहे. अंतिम टप्प्यात दोन किंवा तीन उमेदवारांना सारखे गुण मिळाल्यास, भरती नियमांनुसार योग्य पात्रता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. यामध्येही सारखेपणा असल्यास वयाने मोठ्या उमेदवारास प्राधान्य दिले जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mSEyyE
via IFTTT

Post a Comment

0 Comments