Also visit www.atgnews.com
ITI Limited Recruitment 2021: बीटेक आणि एमबीए पास तरुणांसाठी बंपर भरती
ITI Limited : बीटेक किंवा एमबीए उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. या उमेदवारांकडून आयटीआय लिमिटेडने विविध पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या अंतर्गत मुख्य व्यवस्थापक (Chief Manager), उप व्यवस्थापक (Deputy Manager, Manager), व्यवस्थापक/मुख्य व्यवस्थापक (Chief Manager), मुख्य वित्त व्यवस्थापक (Chief Finance Manager)/वित्त व्यवस्थापक (Finance Manager) /सहाय्यक वित्त व्यवस्थापक (Assistant Finance Manager) या पदांवरील रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदभरतीअंतर्गत एकूण ४१ पदांची भरती केली जाणार आहे. या पदासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. ITI Limited Recruitment 2021: महत्वाच्या तारखा ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: २५ नोव्हेंबर २०२१ अर्जाची हार्ड कॉपी जमा करण्याची शेवटची तारीख: २९ नोव्हेंबर २०२१ शैक्षणिक पात्रता मुख्य व्यवस्थापक / व्यवस्थापक (श्रेणी VI / V) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन /, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकलमध्ये B.Tech पदवी असणे गरजेचे आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. याशिवाय राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ५८ टक्के गुण असणे आवश्यक आहे. मुख्य व्यवस्थापक - डेटा सेंटर आणि सेल्स मार्केटिंग ग्रेड-VI या पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनीअरिंगमध्ये पदवी असणे गरजेचे आहे. याशिवाय उमेदवारांनी एमबीए मार्केटिंग केलेले असावे. उपव्यवस्थापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इंजिनीअरिंगमध्ये ६० टक्के गुण असावेत. याशिवाय एससी, एसटी,पीडब्ल्यूडीमध्ये ५८ टक्के गुण असावेत. या परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटला भेट देणे गरजेचे आहे. या पदांसाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट @itiltd.in वर भेट देऊन ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्यापुर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपुर्वक वाचणे गरजेचे आहे. २५ नोव्हेंबर २०२१ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्जात काही त्रुटी आढळल्यास किंवा शेवटच्या तारखेनंतर कोणताही फॉर्म स्वीकारला जाणार नाही.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mRGqru
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments