JNUEE 2021 Result: पीजी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

Result: जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रवेश परीक्षा (JNUEE) चा निकाल जाहीर झाला आहे. एमए, एमएससी आणि एमसीए अभ्यासक्रमांच्या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइट jnuee.jnu.ac.in वर निकाल पाहता येणार आहे. JNUEE तपासण्यासाठी उमेदवारांनी अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख यांच्या मदतीने लॉगिन करणे आवश्यक आहे. पीजी परीक्षा २० ते २३ सप्टेंबर २०२१ या कालावधीत घेण्यात आली होती. ही परीक्षा सीबीटी माध्यमातून घेण्यात आली होती. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ प्रवेश परीक्षेची उत्तरतालिका ११ ऑक्टोबरला प्रसिद्ध झाली होती. उमेदवारांना १२ ऑक्टोबरपर्यंत उत्तरतालिकेवर आक्षेप नोंदवण्याची मुभा होती. NTA ने आपल्या नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 'उमेदवारांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची पडताळणी विषय तज्ञांच्या पॅनेलद्वारे करण्यात आली. आक्षेप योग्य आढळल्यास उत्तरतालिकेत सुधारणा करण्यात आली. अंतिम उत्तरतालिकेच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. उमेदवारांना बातमीखाली दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून निकाल पाहता येणार आहे. JNUEE 2021 Result: असा तपासा स्टेप १: उमेदवारांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट jnuee.jnu.ac.in वर जा. स्टेप २: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप ३: त्यानंतर अर्ज क्रमांक आणि जन्मतारीखच्या मदतीने लॉगिन करा. स्टेप ४: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल. स्टेप ५: निकाल तपासा. डाऊनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट काढा परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार विद्यापीठाच्‍या पीजी कोर्सेसमध्‍ये प्रवेशासाठी पात्र असतील. जेएनयूने इतर निकाल जाहीर होण्याची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आली नाही. पण लवकरात लवकर निकाल जाहीर करण्यासाठी राष्ट्रीय चाचणी एजन्सीसोबत काम सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3HYdI0v
via IFTTT

Post a Comment

0 Comments