Omicron च्या भीतीने 'या' राज्यात शाळांबाबत मोठा निर्णय

Variant Spreading: करोनाचा (Covid19) नवीन प्रकार असलेल्या ओमीक्रॉनचा (Omicron) धोका लक्षात घेता मध्य प्रदेशातही (School Reopening in Madhya Pradesh सतर्कतेच्या सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निम्म्या क्षमतेने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, ऑनलाइन क्लासेसचा पर्याय सुरू ठेवण्याचा आणि शाळेत येणाऱ्या मुलांसाठी पालकांची संमती आवश्यक ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. १८ वर्षांखालील मुलांसाठी शाळा उघडल्या जातील पण विद्यार्थ्यांची उपस्थिती ५० टक्के असणार आहे. ५० टक्के मुले एका दिवशी शाळेत येतील आणि उरलेली ५० टक्के दुसऱ्या दिवशी शाळेत येऊ शकणार आहेत. विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासचा पर्याय असेल आणि पालकांची इच्छा असेल तरच मुले शाळेत जातील. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असेल. हे नवे नियम २९ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. मुख्यमंत्री चौहान यांनी याबाबत माहिती दिली. अलीकडेच पूर्ण क्षमतेने शाळा उघडल्या सरकारी आणि खासगी शाळा सुरू करण्याबाबत मध्य प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेत पालकांना दोन पर्याय दिले आहेत. शाळा नक्कीच उघडतील, पण विद्यार्थ्यांची उपस्थिती ५०% राहील. अलीकडेच सरकारने १०० टक्के क्षमतेच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला पालकांचा विरोध होता. शासनाच्या निर्णयानुसार आता मुले आठवड्यातून फक्त तीन दिवस अभ्यासासाठी जाणार आहेत. शाळांना ऑनलाइन वर्ग सुरू ठेवावे लागतील, त्यामुळे पालकांना हा पर्याय उपलब्ध आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांत किमान सहा फुटांचे अंतर ठेवणे, मास्क वापरणे, हात धुणे, स्वच्छतेबाबत प्रशिक्षण देणे आदी सूचना यात करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे शिक्षकांच्या लसीकरणावरही भर देण्यात आला आहे. शाळा उघडण्यापूर्वी प्रतिबंधित क्षेत्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शाळांत बोलवू नये, शाळांची संपूर्ण स्वच्छता करून घ्यावी. शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी घेतली जाऊ नये. शाळांमध्ये गर्दी होणार नाही असे कोणतेही खेळ, कार्यक्रम, उपक्रम आयोजित करू नयेत, आदी सूचना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात संभ्रम कायम राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याचा (School Reopening in Maharashtra) निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र ओमिक्रॉन संसर्गाची () भीती उभी ठाकल्याने शाळा सुरू करण्याबाबतच्या निर्णयाचा फेरविचार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यातच आरोग्य संचालकांनी शाळा सुरू करताना काय काळजी घ्यायची याबाबत सूचना जाहीर केल्या आहेत. ओमिक्रॉन आणि त्याविषयीची चिंता सर्वत्र पसरली असल्याने राज्यात १ डिसेंबरपासून पहिली ते चौथी आणि सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. शाळा सुरू करण्याबाबत मुंबई महापालिकेने सावध भूमिका घेतली आहे. तर, दुसरीकडे राज्य आरोग्य सेवा संचालनालयाने शाळा सुरू करण्यासाठी रविवारी मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्याने मुंबईतील शाळांसंदर्भात नेमका निर्णय कधी होणार, याकडे पालकांचे लक्ष आहे. आरोग्य सेवा संचालनालयाने प्रसारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये राज्यातील सर्व शाळा, जिल्हे, महापालिका, नगरपालिका, छावणी बोर्ड आदी शाळांचा समावेश करण्यात आला आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3pfoiYG
via IFTTT

Post a Comment

0 Comments