अभियांत्रिकीच्या ५७ हजार जागा रिक्त

म. टा. प्रतिनिधी, पुणे राज्य सामाइक परीक्षा कक्षाकडून (CET Cell) दोन फेऱ्या राबविल्यानंतरही राज्यात अभियांत्रिकीच्या ५७ हजार जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनासारखे महाविद्यालय आणि विद्याशाखा मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी समुपदेशन फेरीची वाट पाहणे पसंत केल्याचे दिसत असून आतापर्यंत ७३ हजार १०९ प्रवेश निश्चित झाले आहेत. अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशातील पहिल्या व दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर 'ऑप्शन फॉर्म' भरलेल्या एक लाख ८ हजार ४१७ विद्यार्थ्यांपैकी दोन्ही फेऱ्यांमध्ये ७३ हजार १०९ प्रवेश निश्चित झाले आहेत. यामुळे ५७ हजार ७२७ जागा रिक्त असल्याने आता या विद्यार्थ्यांना समुपदेशन फेरीत प्रवेश घ्यावा लागणार आहे. राज्यात प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांपैकी पहिल्या प्रवेशाच्या यादीत ७७ हजार ८७७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले होते; तर दुसऱ्या फेरीत ८७ हजार २७२ विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ केले. यातील बहुतांशी विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश न घेतल्याचे चित्र आहे. या विद्यार्थ्यांना आता समुपदेशन फेरीमार्फत प्रवेश देण्यात येतील, असे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही फेरी संस्थास्तरावर होणार आहे. सद्यस्थिती एकूण जागा : १,३०,८३६ फेरीसांठी पात्र विद्यार्थी : १,०८,४१७ झालेले प्रवेश : ७३,१०९ दोन फेरीनंतरच्या शिल्लक जागा : ५७,७२७


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ewGZSr
via IFTTT

Post a Comment

0 Comments