भरती प्रकरणातील सायबर पोलिसांच्या कारवाईनंतर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया

Health and : पेपरफुटी प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आता आरोग्य आणि शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनीच पेपर फोडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान राज्याचे कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भरती प्रकरणात जो दोषी असेल त्याला शिक्षा होईल असे थोरात म्हणाले. आरोग्य विभागाच्या पेपरफुटीचा तपास करीत असताना सायबर पोलिसांना म्हाडाच्या पेपरबाबतची माहिती मिळाली. म्हाडा परीक्षेचा पेपर फुटताना जी ए सॉफ्टवेअर कंपनीचा डा. प्रीतीश देशमुख व अन्य दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली. या प्रतिक्रिया देताना बाळासाहेब थोरात म्हणाले, पदभरती परीक्षा घेण्यासाठी पॅनलवर असलेल्या संस्थांना आमचा विरोध आहे. परीक्षांसाठी विश्वासहार्य आणि योग्य संस्थेला जवाबदारी दिली पाहिजे. परिक्षा भरती घोटाळात जे झाले ते चुकीचे होते. ज्या संस्था परीक्षा घेतात त्यांच्यावर आमचा त्यावरच आक्षेप आहे. त्यामुळे याऐवजी विश्वासार्ह संस्थांना जबाबदारी द्यावी असे थोरात म्हणाले. या संस्थांवरील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या मागील सरकारने केल्या आहेत. आता संस्था बदलल्या पाहिजे आणि उच्च दर्जाच्या संस्था निवडल्या पाहिजेत असेही ते म्हणाले. आरोग्य भरती विभागाच्या परीक्षेची जबाबदारी घेणारी न्यासा ही पॅनल वरची संस्था आहे. पॅनल म्हणजे विश्वासार्हता असते. मंत्री बारकाईत जात नसल्याचे ते म्हणाले. 'म्हाडा' पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. प्रीतीश देशमुख याच्या घराची झडती घेतल्यानंतर पोलिसांना गुरुवारी पेन ड्राइव्हसह महत्त्वाची कागदपत्रे मिळाली होती. त्या पेन ड्राइव्हमधील डेटामधून पोलिसांना आणखी काही माहिती मिळाली. त्या दृष्टीने तपास सुरू होता. देशमुख याच्या घरी आढळलेल्या कागदपत्रांमध्ये टीईटी परीक्षेसंदर्भातीलही काही कागदपत्रे सापडली. परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणांमुळे विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. म्हाडा भरती परीक्षा आता फेब्रुवारीमध्ये 'म्हाडा'तील वेगवेगळ्या १४ संवर्गातील ५६५ रिक्त पदे भरण्यासाठी जीए सॉफ्टवेअर कंपनीची निवड वादग्रस्त ठरली. या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हा पेपर फोडल्याचे कारस्थान रचल्याचे उघड होताच म्हाडाने ही परीक्षा रद्द केली. त्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळानंतर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ही परीक्षा टीसीएस कंपनीकडून घेण्यात येईल, अशी घोषणा केली. ऐन परीक्षेच्या दिवशीच परीक्षा रद्द झाल्याने ही परीक्षा देणाऱ्या पावणेतीन लाख उमेदवारांची मोठी गैरसोय झाली. त्यांना आता परीक्षेसाठी नव्याने तयारी करावी लागणार आहे; तसेच त्याप्रमाणे 'म्हाडा' अधिकाऱ्यांकडून परीक्षेच्या आयोजनासंदर्भात तयारी केली जाणार आहे. ही परीक्षा आता फेब्रुवारीमध्ये घेण्यात येईल, असे 'म्हाडा'तील सूत्रांनी सांगितले. या परीक्षेत पारदर्शकता जपली जावी, यावरही विशेष लक्ष दिले जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3p1VbJc
via IFTTT

Post a Comment

0 Comments