TET Exam Scam: तुकाराम सुपेंकडे आतापर्यंत किती कोटींची रक्कम सापडली? जाणून घ्या

म. टा. प्रतिनिधी, पुणे / मुंबई शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहारात () अटक केलेल्या राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त () यांची मुलगी व जावयाच्या मित्रांच्या घरात पोलिसांना एक कोटी ५८ लाख रुपयांची रोकड व ४४ प्रकारचे दीड किलो दागिने असा मुद्देमाल मिळाला आहे. त्यामुळे सुपेकडून पोलिसांनी जप्त केलेल्या रकमेचा आकडा हा अडीच कोटीं रुपयांवर गेला आहे. दरम्यान, सुपे यांना अटकेच्या दिवसापासून निलंबित करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड (Education Minister Varsha Gaikwad) यांनी दिली. टीईटी गैरव्यवहार प्रकरणात तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत आहे. या दोघांकडे चौकशी केल्यानंतर सुपे याने मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केली असल्याचे आढळून आले; तसेच, आरोपीकडे दोन पैशांच्या बॅगा असून त्यापैकी एक बॅग मुलीकडे, तर दुसरी बॅग जावयाच्या मित्राच्या घरी ठेवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सुपेची मुलगी कोमल पाटील व जावई नितीन पाटील या दोघांना बोलावून त्यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतर पोलिसांचे पथक आळंदीजवळील चऱ्होली येथे गेले. त्यांनी घराची झडती घेतली. त्या वेळी पोलिसांना ९७ हजार रुपयांची रोकड मिळाली; परंतु पोलिसांना मिळालेल्या माहितीप्रमाणे पैशांच्या बॅगा न मिळाल्याने पोलिसांनी मुलगी व जावयाकडे कसून चौकशी केली. तेव्हा, नितीन याचा मित्र विपीन याच्या वाघोली येथील बंद फ्लॅटमध्ये पैशांच्या बॅगा ठेवल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, पोलिसांनी पुन्हा विपीनच्या घराची झडती घेतली. त्या वेळी त्या ठिकाणी पैशाच्या दोन बॅगा आढळून आल्या. त्यामध्ये एक कोटी ५८ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम आढळून आली; तसेच अन्य बॅगांमध्ये ४४ प्रकारांमधील सोन्याचे दागिने आढळून आले. सुपे यास अटक केल्यानंतर त्याच्या घरातून ८८ लाख ४९ हजार रुपयांची रोकड, सोन्याचे दागिने, पाच लाख ५० हजार रुपयांची मुदतठेवीची कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली होती. आत्तापर्यंत सुपे याच्याकडून अडीच कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पेपरफुटीत आणखी एकाला अटक आरोग्य भरती पेपरफुटीमध्ये सायबर पोलिसांनी बीडमधून आणखी एकाला अटक केली आहे. संजय शाहूराव सानप (वय ४०, रा.वडझरी, पाटोदा, बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पूर्वी अटक केलेल्या आरोपीचा सानप नातेवाइक असून पेपरफुटीमध्ये याचा सहभाग असल्याचे आढळून आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य भरती पेपरफुटीमध्ये अटक झालेल्यांची संख्या आता १८ झाली आहे. सानप याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याने किती परीक्षार्थींना पेपर देऊन त्या बदल्यात पैसे घेतले, त्याने कोणाकडून हा पेपर मिळविला याचा तपास करण्यासाठी त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. ती मान्य करून न्यायालयाने सानप याला २३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ‘टीईटी परीक्षे’ची होणार चौकशी शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात पुणे सायबर पोलिसांना कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडले आहे. टीईटी परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणावरील भ्रष्टाचार झाल्याची शक्यता पाहता २०१६पासून घेण्यात आलेल्या परीक्षेची चौकशी करण्यात येणार आहे. त्यामुळे गैरमार्गाने पास होऊन नोकरीला लागलेल्यांचेही धाबे दणाणले आहे. समितीची स्थापना ‘टीईटी’मधील अनियमिततेची सखोल चौकशी करण्यासाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. या समितीमध्ये पुण्यातील आयुक्त (शिक्षण), शिक्षण संचालक (प्राथमिक), शिक्षण संचालक (माध्यमिक), माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे संचालक सदस्य असतील. प्राथमिक चौकशी अहवाल सात दिवसांत व सविस्तर चौकशी अहवाल १५ दिवसांत शालेय शिक्षणमंत्र्यांना सादर करण्यात येईल.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3mnitYd
via IFTTT

Post a Comment

0 Comments