Also visit www.atgnews.com
Artillery Centre Recruitment: तोफखाना केंद्रात विविध पदांची भरती
Recruitment: तोफखाना केंद्र नाशिक यांच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. नाशिक येथील तोफखाना केंद्रामध्ये विविध पदांच्या १०७ जागा भरण्यात येणार आहेत. याअंतर्गत लोअर डिव्हिजन क्लर्क सुतार(Lower Division Clerk), मॉडेल मेकर (Model Maker, Carpenter), कुक (Cook), रेंज लास्कर (Range Lasker), फायरमन (Fireman), आर्टी लास्कर (Artie Lasker), नाई (Barber), धोबी (Washerman), एमटीएस (माळी आणि मुख्य माळी) (MTS (Gardener & Chief Gardener)), एमटीएस (वॉचमन) (MTS (Watchman)), एमटीएस (संदेशवाहक) (MTS (Messenger)), एमटीएस (सफाईवाला) (MTS (Cleaner)), घोडेवाला (Horseman), MTS लास्कर (MTS Laskar), सामग्री दुरुस्त्रीकार आणि मल्टी टास्किंग स्टाफ (Content repairer and multi-tasking staff) पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदांसाठी लागणाऱ्या शैक्षणिक अर्हतेचा तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. रिक्त पदांमध्ये बदल करण्याचा, भरती पुढे ढकलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार संस्थेने राखून ठेवला आहे. या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज कमांडंट, मुख्यालय, आर्टिलरी सेंटर, नाशिक रोड कॅम्प, नाशिक, पिनकोड- ४२२१०२ या पत्त्यावर पाठवायचा आहे. २१ जानेवारी २०२२ ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3G6qMiW
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments