रणजितसिंह डिसले गुरुजींना १५३ दिवसांची रजा मंजूर; सोलापूर जिल्हा शिक्षण विभागाची नमती भूमिका

सोलापूर, प्रतिनिधी: सोलापूर शहर जिल्हा आणि महाराष्ट्रभर चर्चा होत असलेले ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले गुरुजी यांना परदेशात स्कॉलरशिपसाठी जाण्यासाठी अखेर रजा मंजूर झाली आहे. १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत त्यांना रजा मिळाली आहे. ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांना परदेशात स्कॉलरशिप संपादन करण्यासाठी आता जाता येणार आहे. शिक्षण विभागाने नुकतीच त्यांची अध्ययन रजा मंजूर केली आहे. १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत म्हणजेच एकूण १५३ दिवसांसाठी त्यांना रजा देण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी तयार केलेल्या चौकशी अहवालावर पडदा टाकून सुट्टी मंजूर केल्याची देखील चर्चा सुरू आहे.शिक्षण विभागामार्फत नमती भूमिका घेतल्याने डीसले यांना रजा मंजूर झाली आहे.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यामध्ये लक्ष घालून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना रजा मंजूर करण्याबाबत निर्देश दिले होते. सुट्टीच्या दिवशी रजा मंजूर ग्लोबल टीचर हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरही परदेशात स्कॉलरशीपसाठी जाण्याकरता डिसले यांना बऱ्याच अडचणी येत होत्या. त्यांच्याबद्दल एक चौकशी अहवाल देखील समोर आला होता.२०१७ साली रणजितसिंह डिसले यांची जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्र येथे प्रतिनियुक्तीवर नियुक्ती करण्यात आलेली होती. मात्र या ठिकाणी डिसले गुरुजी हे तीन वर्षे गैरहजर होते. असा अहवाल जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यांकडून प्राप्त झाला होता. पण या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना डिसले यांना स्कॉलरशीपसाठी परदेशात पाठवण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे यासाठी शिक्षण विभागाने म्हणजेच रविवारी सुट्टीच्या दिवशी काम करुन डिसले गुरुजींची रजा मंजूर केली आहे. फुलब्राईट स्कॉलरशिपसाठी रजा मंजूर सोलापूर शिक्षण विभागाने नुकतीच ही माहिती दिली असून या माहितीत डिसले यांना अमेरिकन सरकारच्या फुलब्राईट फॉरेन स्कॉलरशिप बोर्ड स्कॉलरशीपसाठी अध्ययन रजा मंजूर करण्यात आल्याचे कळवले आहे. यामध्ये त्यांना १ऑगस्ट ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत म्हणजेच एकूण १५३ दिवसांसाठी रजा देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33GPR6h
via IFTTT

Post a Comment

0 Comments