IBPS SO मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

Mains : इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सोनल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection) द्वारे स्पेशालिस्ट ऑफिसर पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर आता मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र ( Mains Exam Admit Card 2022) डाउनलोड करू शकतात. या भरतीसाठी मुख्य परीक्षा ३० जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. आयबीपीएस स्पेशालिस्ट ऑफिसर भरतीसाठी जाहीर केलेल्या या रिक्त पदांद्वारे एकूण १८२८ पदांची भरती केली जाणार आहे. आयबीपीएस एसओ पूर्व परीक्षा निकाल २०२२ (IBPS SO Prelims Result 2022) साठी अर्ज केलेला उमेदवारांना आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन निकाल आणि परीक्षेचा संपूर्ण तपशील पाहता येणार आहे. IBPS SO Prelims Admit Card: असे करा डाऊनलोड प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ibps.inवर जा. वेबसाइटच्या होम पेजवर भरती २०२१-११ वर क्लिक करा. सहभागी बँक- (CRP SPL-XI) मधील विशेष अधिकार्‍यांच्या सामान्य भरती प्रक्रियेच्या लिंकवर जा. ऑनलाइन मुख्य परीक्षेच्या कॉल लेटरच्या लिंकवर क्लिक करा. उमेदवार अर्ज क्रमांक आणि पासवर्ड भरा. प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल. प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि भविष्यातील उपयोगासाठी प्रिंट घ्या. रिक्त जागांचा तपशील इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, एकूण १८२८ पदांची भरती केली जाणार आहे. स्पेशालिस्ट ऑफिसरमध्ये आयटी ऑफिसरसाठी २२० जागा, कृषी फील्ड ऑफिसरसाठी ८८४ जागा, राजभाषा अधिकारीसाठी ८४ जागा, लॉ ऑफिसरसाठी ४४ जागा, एचआर किंवा पर्सनल ऑफिसरसाठी ६१ जागा आणि मार्केटिंग ऑफिसरसाठी ५३५ जागा भरल्या जात आहेत. क्लर्क मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र आयबीपीएस लिपिक भरती २०२१ मुख्य परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. या रिक्त पदांद्वारे ७८५८ पदांची भरती केली जाणार आहे. यापूर्वी या भरती प्रक्रियेतून ७८०० क्लर्क पदे भरली जाणार आहेत. आयबीपीएसद्वारे ५८ पदांची वाढ करण्यात आली.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3KrQUaz
via IFTTT

Post a Comment

0 Comments