Also visit www.atgnews.com
म्हाडा सरळसेवा भरती परीक्षेत 'हायटेक' कॉपी! दोघांना अटक
म. टा. प्रतिनिधी, नाशिक डिसेंबरमध्ये परीक्षेच्या दिवशी पहाटे पेपर फुटल्याचे लक्षात आल्यावर स्थगित झालेली म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा ( Recruitment Exam) सध्या राज्यात ई-स्वरूपात सुरू आहे. त्यातील गैरव्यवहार टाळण्यासाठी म्हाडाने पूर्णपणे कंबर कसली आहे. तर, नाशिकमध्ये 'हायटेक' कॉपी करण्यासह बनावट उमेदवार म्हणून परीक्षेत बसण्याचा प्रयत्न झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी बनावट उमेदवारासह मूळ उमेदवाराच्या भावाला अटक झाली आहे. त्यांचा तीन दिवस पोलिस कोठडीत मुक्काम असेल, तर मूळ उमेदवाराचा शोध सुरू आहे. गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) परीक्षेच्या शेवटच्या दिवशी (दि. ९) इंदिरानगरमधील परीक्षा केंद्रावर बनावट उमेदवार असल्याचे समजले. डिसेंबरमध्ये स्थगित झालेली परीक्षा ३१ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या काळात राज्यातील विविध केंद्रावर घेण्यात आली. त्यावेळी ऐन शेवटच्या दिवशी परीक्षेला नाशिकमध्ये गालबोट लागले. दुपारी साडेबारा ते अडीच या वेळेतल्या सत्रासाठी उमेदवारांची धातूशोधक यंत्राने तपासणी करण्यात आली. त्यावेळी एकाने मोबाइलसह इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस लपविल्याचे समजले. त्याची कसून चौकशी केल्यावर ओळखपत्र आणि कागदपत्रांतही खोट असल्याचे उघड झाले. त्यावरून संशयित बनावट उमेदवार ज्ञानेश्वर श्रीमंत डिघुळे (२२) याला इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचवेळी परीक्षा केंद्रालगत मूळ उमेदवाराचा भाऊ संशयित योगेश सिताराम बहुरे (२३) हा देखील मोबाइल व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइससह आढळला. तिथे मोबाइल प्रतिबंधित असल्याने त्यालाही अटक करण्यात आली. दोघांना गुरुवारी (दि. १०) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. शासकीय परीक्षेत गैरप्रकार करून फसवणूक करण्यासह एकपेक्षा अधिकांनी एकत्रित येत गुन्हा केल्याची तक्रार पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केली आहे. त्यानुसार न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनाविली आहे. या प्रकरणी दोघांची सखोल चौकशी होणार असल्याची माहिती तपासी अंमलदार सहायक पोलिस निरीक्षक निखील बोंडे यांनी दिली. बनावटगिरी कित्येकांसाठी? 'म्हाडा'च्या परीक्षेत लिपिक पदासाठी चोटिराम सिताराम बहुरे या उमेदवाराने अर्ज केला. मात्र, त्याऐवजी बनावट उमेदवार डिघुळे परीक्षा केंद्रात पोहोचला. त्यासोबत बहुरेचा भाऊ योगेश आढळून आला. हे तिघेही औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. त्यांचे कला शाखेतून पदवीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. तर, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. संशयित चोटिरामला लवकरच अटक होईल. यासह डिघुळे आणि बहुरे यांनी यापूर्वी इतर परीक्षेत गैरप्रकार केले का, तसेच डिघुळे याने बनावट उमेदवार म्हणून यापूर्वीही परीक्षा दिली का, यासह या प्रकरणी इतर संशयित कोण, याचा इंदिरानगर पोलिस शोध घेत आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/HiexAUu
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments