Also visit www.atgnews.com
डॉ. भूषण पटवर्धन 'नॅक'चे नवे अध्यक्ष
म. टा. प्रतिनिधी, पुणे विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) माजी उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन (Dr. Bhushan Patwardhan) यांची राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्विकृती परिषदेच्या () अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून 'नॅक' अध्यक्षपदी नेमणूक होणारे डॉ. पटवर्धन दुसरे व्यक्ती ठरले आहेत. 'यूजीसी'ने डॉ. पटवर्धन यांच्या नियुक्तीबाबत माहिती दिली असून, ही नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल. 'नॅक'चे अध्यक्ष प्रा. जगदीश कुमार यांची नियुक्ती 'यूजीसी'च्या अध्यक्षपदी झाल्यानंतर हे पद रिक्त होते. या नियुक्तीबाबत डॉ. पटवर्धन म्हणाले, 'केंद्र सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उललली आहेत. त्या अनुषंगाने या धोरणाला 'नॅक'च्या कार्यप्रणालीशी सुसंगत करण्याचे पहिले उद्दिष्ट राहणार आहे. या धोरणानुसार देशातील महाविद्यालयांना 'नॅक'चे मूल्यांकन करणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे महाविद्यालयांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासोबतच, महाविद्यालयांना शैक्षणिकदृष्ट्या परिपूर्ण करण्याचे मोठे काम करावे लागणार आहे. त्यासाठी 'नॅक'ची कार्यप्रणाली अधिक गतिमान करावी लागणार आहे. या प्रणालीची व्याप्ती वाढविण्यासोबतच, विस्तार करावा लागेल. 'नॅक'चे ध्येय पूर्ण करण्यासाठी, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व घटकांना एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न राहणार आहे, असे ते म्हणाले. हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jOAGSlX
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments