शिक्षकांनी शनिवार, रविवारही वर्ग घ्यावेत; पवारांनी घेतली जि.प. शिक्षकांची शाळा

पुणे: जिल्हा परिषदेच्या शाळा चांगल्या नसतात असा समज झाला होता, परंतु, अधिकारी आणि।पदाधिकारी यांनी लक्ष घातले आहे, त्यामुळे पट वाढत आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जिल्हा परिषद शाळांच्या कामगिरीविषयी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. शिक्षकांनाही चार हिताच्या गोष्टी सांगण्यास पवार यावेळी विसरले नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेल्या शिक्षकांची मुले झेडपी शाळेत नाहीत, तोपर्यंत आपण पालकांना कसं सांगणार की तुम्ही तुमची मुले जिल्हा परिषद शाळेत पाठवा, असं पवार यावेळी म्हणाले. त्याचवेळी करोनानंतर आता नव्या दमाने कामाला लागत शिक्षकांना शनिवार, रविवारीही वर्ग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. करोनाचे संक्रमण कमी होत असल्याने आता येत्या २ मार्चपासून नर्सरी, केजीचे वर्ग सुरू करण्याचीही परवानगी देण्यात आली असल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली. जम्बो कोविड सेंटर बंद केले जाणार आहे, असेही ते म्हणाले. ऑनलाइन शिक्षणाबाबतही अजित पवारांनी टिप्पणी केली. ते म्हणाले, 'प्रत्यक्ष शिक्षणा प्रमाणे ऑनलाइन शिकवता येत नाही, त्यासाठी मर्यादा येतात. म्हणूनच आता विद्यार्थी शाळा विसरले असून, त्यांना पुन्हा शाळेची गोडी लावावी लागेल, असे आवाहन पवार यांनी शिक्षकांना केले.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ZXtdm7a
via IFTTT

Post a Comment

0 Comments