Also visit www.atgnews.com
NIFT परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, आक्षेप नोंदविण्यासाठी 'येथे' क्लिक करा
2022: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (National Institute of , NIFT) ने एनआयएफटी परीक्षेची तात्पुरती जाहीर केली आहे. या परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट- nift.ac.in वर जाऊन उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. उमेदवारांना आवश्यक लॉगिन क्रेडेन्शियल्स भरुन एनआयएफटी उत्तरतालिका डाउनलोड करता येणार आहे. एनआयएफटी उत्तरतालिकेसोबतच अधिकाऱ्यांनी प्रश्नपत्रिकाही प्रसिद्ध केली आहे. एनआयएफटी प्रवेश परीक्षा ६ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन प्रॉक्टोर्ड पद्धतीने घेण्यात आली. NIFT २०२२ या उत्तर तालिकेशी समाधानी नसलेले उमेदवार प्रति प्रश्न ५०० रुपये आक्षेप शुल्क भरून आव्हान देऊ शकतात. कोणत्याही प्रश्नावर आक्षेप नोंदविताना पुरेसे पुरावे सादर करावे लागतील. नोंदणीकृत तक्रार खरी असल्याचे आढळल्यास, त्या आक्षेपासाठी पाठवलेले शुल्क परत केले जाईल. उत्तरतालिका तपासून, उमेदवार त्यांच्या स्कोअरचा अंदाज लावू शकतात. एनआयएफटी उत्तरतालिका डाउनलोड करताना, उमेदवारांनी रोल नंबर, प्रोग्राम कोड, बुकलेट श्रृंखला आणि जन्मतारीख हे लॉगिन क्रेडेंशियल्स काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. Answer Key 2022: अशी करा डाउनलोड NIFT ची अधिकृत वेबसाइट nift.ac.in वर जा. 'लेखी परीक्षेसाठी उत्तरतालिका' या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर एक नवीन पेज उघडेल. येथे मागितलेली माहिती भरा. NIFT उत्तरतालिका कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील उपयोगासाठी एनआयएफटी उत्तरतालिकेची (NIFT Answer Key) प्रिंटआउट डाउनलोड करा आणि प्रिंट घ्या. बातमीखाली थेट उत्तर की पाहण्यासाठी लिंक देण्यात आली आहे. असा नोंदवा आक्षेप उमेदवारांना उत्तरतालिकेमध्ये काही चूक आढळल्यास NIFT च्या अधिकृत वेबसाइटवर जा. 'लेखी परीक्षेसाठी उत्तरतालिका' टॅबवर क्लिक करा. ऑनलाइन पद्धतीने उत्तरे जुळवा आणि आक्षेप नोंदवा. फीडबॅक सबमिट करण्यासाठी Click Here टॅबवर क्लिक करा. आवश्यक क्रेडेन्शियल्स भरा. रोल नंबर, जन्मतारीख, वेळापत्रक आणि प्रश्न पुस्तिका सिरीजसमोरील बटणावर क्लिक करा. प्रश्न क्रमांक, निरीक्षण आणि उपाय आणि/किंवा निरीक्षणाचे औचित्य निवडा. 'पेमेंटसाठी पुढे जाट बटणावर क्लिक करा आणि तुमचे आक्षेप सबमिट करा. आक्षेप नोंदविल्याप्रमाणे शुल्क भरा. अंतिम उत्तरतालिका कधी जाहीर होणार? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (NIFT) ने २१ ते २४ फेब्रुवारी दरम्यान एनआयएफटी २०२२ उत्तरतालिकेवर हरकत नोंदविण्यासाठी विंडो सुरू केली आहे. एनआयएफटी उत्तरतालिकेवरील आक्षेप विंडो बंद केल्यानंतर, अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन मोडमध्ये अंतिम उत्तरतालिका आणि NIFT निकाल जाहीर केला जाईल. एनआयएफटी स्कोअरकार्ड डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचे एनआयएफटी लॉगिन क्रेडेन्शियल्स वापरावे लागेल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/aqSgQOP
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments