Russia-Ukraine Conflict: युक्रेनमध्ये २० हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थी, सरकारने घेतला 'हा' निर्णय

Russia : रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी (Russia's President) २४ फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनवर लष्करी कारवाई (Ukrainian military action)चे आदेश दिल्यानंतर हल्ला सुरू झाला आहे. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या २० हजारांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Student) मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारचे (Indian Government) प्रयत्न आधीच सुरू आहेत. विद्यार्थ्यांना युक्रेनमधून बाहेर काढण्यासाठी उच्च स्तरावर प्रयत्न केले जात आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलच्या (Nation Security Counsil) बैठकीत याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या परतण्यासाठी संपूर्ण व्यवस्था केली जात असल्याचे ते यावेळी म्हणाले. तिरुमूर्ती यांनी यूएनएससीमध्ये सांगितले की, 'युक्रेनमधील २० हजारहून अधिक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. आम्ही विद्यार्थ्यांसह सर्व भारतीय नागरिकांना परत येण्याची सोय करत आहोत.' दुसरीकडे, भारतीय विद्यार्थ्यांसह १८२ प्रवाशांना घेऊन एक फ्लाइट आज २४ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली विमानतळावर पोहोचली. या प्रवाशांना इंटरनॅशनल एअरलाइन्स ( International Airlines, UIA)) ने दिल्लीत आणले होते. सर्व भारतीय विद्यार्थ्यांनी तात्पुरते युक्रेन सोडावे असा सल्ला २० फेब्रुवारी २०२२ रोजी युक्रेनची राजधानी कीव येथील भारतीय दूतावासाने जारी केला होता. त्याचबरोबर दूतावासाने विद्यार्थ्यांना चार्टर फ्लाइटसाठी संबंधित कंत्राटदाराशी संपर्क साधावा आणि दूतावासाच्या सोशल मीडिया चॅनेल आणि वेबसाइटवर प्रसिद्ध होणाऱ्या अपडेट्सवर लक्ष ठेवावे, असे आवाहन केले होते.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/qVtDdWp
via IFTTT

Post a Comment

0 Comments