Also visit www.atgnews.com
School Reopening: 'या' कारणामुळे शाळा तात्काळ सुरु करणे गरजेचे, केंद्राचे महत्वाचे निर्देश
Reopening: देशभरातील शाळेत शिकणारी मुले आणि त्यांच्या पालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशातील करोना परिस्थिती नियंत्रणात येत असताना अनेक राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. तरी काही राज्यांनी अजून ऑनलाइन शिक्षणाला महत्व दिल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांना शाळा सुरु करण्यासंदर्भातील महत्वाचे निर्देश दिले आहेत. राज्यात मुलांच्या शाळा तातडीने सुरू करण्यात याव्यात. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी ()शाळा उघडणे आवश्यक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. त्यामुळे राज्यांनी या कामात कोणतीही हलगर्जीपणा दाखवू नये आणि तातडीने शाळा सुरू करण्याची व्यवस्था करावी असे स्पष्ट करण्यात आले आहे. शाळा पुन्हा उघडण्यास केंद्राच्या हस्तक्षेपाची गरज देशातील कोरोना संसर्गाची प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. असे असूनही अनेक राज्ये शाळा उघडण्यात दिरंगाई करीत आहेत. याउलट देशात लवकरात लवकर शाळा सुरू व्हाव्यात, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे. येत्या काही दिवसांत करोनाचा व्हेरिएंट आला आणि परिस्थिती पुन्हा बिघडली तर बंदी येईल, अशी चिंता केंद्र सरकारला वाटत आहे. नवी दिल्लीच्या कालका पब्लिक स्कूलच्या प्राचार्या ओनिका मल्होत्रा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार 'शाळा लवकरात लवकर उघडल्या जाव्यात याकडे शासनाने लक्ष द्यावे. हळूहळू लहान मुलांनाही लस मिळू लागेल. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळा उघडल्या पाहिजेत. एम्सच्या माजी संचालकांचे मत 'देशात अलीकडच्या काळात करोना रुग्णसंख्येमध्ये बरीच घट झाली आहे. अशा परिस्थितीत शाळांमध्ये पुन्हा शिक्षण सुरू होणे गरजेचे आहे. मुलांनाही लसीकरण केले जात आहे, त्यामुळे शाळा सुरू होण्यास अडचण नसल्याची प्रतिक्रिया एम्सचे माजी संचालक डॉ. एम सी मिश्रा यांनी दिली आहे. पालकांनाही त्रास.. तज्ज्ञांच्या मते मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी घराबाहेर पडून शाळेत जाणे आवश्यक आहे. घरात कुलूप असल्याने शारीरिक हालचाल होत नाही आणि अभ्यासही बुडत आहे. या गोष्टी पालकांनाही त्रासदायक ठरत आहेत. बराच काळ मुलं घरातच बसलेली आहे. पण बाहेर त्यांच्या अॅक्टीव्हीटी सुरुच आहेत. कुटुंबातील कुणाला भेटायला जाणे असो किंवा बाहेरगावी जाणे यात खंड पडलेला नसल्याचे मत पालक वर्गाकडून व्यक्त केले जात आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/skrSLgh
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments