Also visit www.atgnews.com
मुंबई विद्यापीठाच्या कोणत्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा कधी? जाणून घ्या...
आणि संलग्न महाविद्यालयांसाठी विद्यापीठाने उन्हाळी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या परीक्षा ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा हायब्रीड पद्धतीने होणार आहेत. १९ एप्रिल २०२२ पासून परीक्षांना सुरुवात होत आहे. पदवीचे निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी पारंपरिक कला, वाणिज्य, विज्ञान व स्वयं अर्थसहाय्यित पदवी अभ्यासक्रमातील सत्र ६ च्या (चॉईस बेस ) नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा या ऑनलाइन घेण्याचा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. मात्र सत्र ६ च्या परीक्षेतील प्रात्यक्षिक परीक्षा मात्र ऑफलाइन घेण्यात येणार आहेत. २०२२ च्या हिवाळी सत्राच्या सर्व परीक्षा ऑफलाइन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या २०२२ च्या हिवाळी सत्राच्या सर्व विद्याशाखेच्या नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा या ऑफलाइन घेण्याचा निर्णयही परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कोणकोणत्या अभ्यासक्रमांच्या परीक्षांना कधीपासून सुरुवात होणार आहे, ते जाणून घ्या.... १. बीकॉम सत्र ६ (B.Com Sem VI) : १९ एप्रिल २०२२ २. बीए सत्र ६ (BA Sem VI) : २१ एप्रिल २०२२ ३. बीएससी सत्र ६ (B.Sc Sem VI) : २१ एप्रिल २०२२ ४. बीए एमएमसी सत्र ६ (BA MMC VI) : २५ एप्रिल २०२२ ५. बीएमएस सत्र ६ (BMS VI) : ४ मे २०२२ ६.बीएएफ सत्र ६ (BAF VI) : ४ मे २०२२ ७. बीएफएमआरटी सत्र ६(BFMrt VI) : ४ मे २०२२ ८. बीबीआय सत्र ६(BBI VI ): ४ मे २०२२ ९. बीआयएम सत्र ६(BIM VI) : ४ मे २०२२ १०. बीएफएम सत्र ६(BFM VI) : ४ मे २०२२ ११. बीटीएम सत्र ६(BTM VI) : ४ मे २०२२ १२. एलएलबी (३ वर्षे कालावधी) सत्र ६ (LLB VI-3year):१७ मे २०२२ १३. बी.एड्. सत्र ४ (B.Ed IV) : १० मे २०२२ १४. बीएस्सी सीएस सत्र ६ (B.Sc CS VI) : २६ एप्रिल २०२२ १५. बीएस्सी आयटी सत्र ६ (B.Sc IT VI) : २६ एप्रिल २०२२ १६. बीएस्सी बीटी सत्र ६ (B.Sc BT VI) : २६ एप्रिल २०२२ १७. बीई सत्र ८(BE Sem VIII) : १७ मे २०२२ हेही वाचा:
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/E8RckSl
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments