Also visit www.atgnews.com
CTET परीक्षा २०२१ निकाल कधी? जाणून घ्या नवीन अपडेट
Result: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education, CBSE) लवकरच अधिकृत वेबसाइटवर सीटीईटी निकाल २०२१ रोजी जाहीर करणार आहे. सध्या CTET २०२१ च्या निकालाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यापूर्वी सीटीईटी निकाल २०२२ हा फेब्रुवारी २०२२ मध्ये जाहीर होणार होता. पण फेब्रुवारीमध्ये निकाल (CTET Exam 2021) जाहीर झाला नाही. त्यामुळे परीक्षेच्या निकालाची उमेदवारांची प्रतिक्षा लांबत चालली आहे. या मार्च महिन्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार रोल नंबर वापरून अधिकृत वेब पोर्टलवरून त्यांचा सीटीईटी निकाल २०२ तपासू शकतात. सीटीईटी डिसेंबर परीक्षेचे आयजोन (CTET डिसेंबर २०२१) १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत करण्यात आले. परंतु तांत्रिक कारणांमुळे १६ आणि १७ डिसेंबरच्या प्रत्येकी एका शिफ्टची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती जी १७ जानेवारी रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर पाहता येईल. सीटीईटी प्रमाणपत्राची वैधता आयुष्यभर राहते. 2021: या स्टेप्स फॉलो करुन पाहा निकाल सीबीएसईद्वारे सीटीईटी डिसेंबर २०२१ चा निकाल अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाहीर केला जाणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार या पोर्टलवरील होमपेजवर सक्रिय करण्यासाठी लिंकवर क्लिक करून निकाल पाहू शकतात. उमेदवारांना या पेजवर तपशील (रोल क्रमांक इ.) सबमिट करून त्यांचा निकाल आणि गुण समजू शकणार आहेत. CTET परीक्षा म्हणजे काय? सीबीएसईतर्फे सीटीईटी परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार देशभरातील केंद्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय आणि आर्मी स्कूलमधील शिक्षकांच्या पदावर नियुक्तीसाठी अर्ज करू शकतात. सीटीईटीच्या पेपर १ मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार इयत्ता पहिली ते पाचवीमधील शिक्षक भरतीसाठी पात्र मानले जातील. तर पेपर २ मध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षक भरतीसाठी पात्र असतील. सीटीईटी २०२१ परीक्षा एकूण १५० गुणांची आहे. उत्तीर्ण होण्यासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना CTET निकाल २०२१ मध्ये किमान ६० टक्के म्हणजेच ९० गुण मिळणे आवश्यक आहे. तसेच राखीव प्रवर्गातील (एससी, एसटी आणि ओबीसी) उमेदवारांना किमान ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Z8YKQ4N
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments