ESIC SSO Recruitment: कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांची भरती

ESIC SSO : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये (, ESIC) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. (ESIC) ने सोशल सिक्युरिटी ऑफिसर (SSO) / मॅनेजमेंट ग्रेड - २ / सुप्रीडेंटच्या या पदांवरील थेट भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. ESIC SSO भरती २०२२ जाहिरातीनुसार, एकूण ९३ रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. यापैकी ४३ जागा अनारक्षित आहेत. तर २४ ओबीसी, ९ जागा एससी, ८ जागा एसटी आणि ९ जाग ईडब्ल्यूएस कोट्यातील उमेदवारांसाठी राखीव आहेत. २०२२: अर्ज प्रक्रिया ESIC ने SSO भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर १२ मार्चपासून अर्जाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना महामंडळाच्या अधिकृत वेबसाइट esic.nic.in भरती विभागात दिलेल्या लिंकद्वारे अर्ज करु शकतात. ESIC SSO Recruitment 2022: पात्रता निकष सोशल सिक्यूरिटी ऑफिसर (SSO) / मॅनेजमेंट ग्रेड-२ / सुप्रीटेंडेंट या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवारांना ऑफिस सुट आणि डेटाबेससह कॉम्प्युटरवर काम करता आले पाहिजे. याव्यतिरिक्त १२ एप्रिल २०२२ रोजी उमेदवारांचे वय २१ वर्षांपेक्षा कमी आणि २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे. राखीव प्रवर्गातील (SC, ST, OBC, इ.) उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना १२ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. यावेळी ५०० रुपये अर्ज शुल्क भरावा लागणार आहे. तसेच अर्जामध्ये आवश्यक दुरुस्त्या/सुधारणा करता येणार आहेत. उमेदवारांना २७ एप्रिलपर्यंत अर्जाची प्रिंटआऊट घेता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/adUIBnQ
via IFTTT

Post a Comment

0 Comments