Also visit www.atgnews.com
Government Job साठी 'या' वेबसाइट्सवर अर्ज केलात तर भरावा लागेल भुर्दंड
fake Recruitment website: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी सरकारने एक महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने ऑनलाइन फसवणूकीची काही उदाहरणे शेअर करत सरकारी नोकरीची जाहिरात पाहून कोणत्याही वेबसाइटवर जाऊन अर्ज करू नका अन्यथा तुमची फसवणूक होऊ शकते, असे निर्देश दिले आहेत. सरकारी वेबसाइट्ससारख्या अनेक बनावट वेबसाइट्स सरकारी खात्यांच्या नावाने चालवल्या जात आहेत. मंत्रालयाने अशा काही वेबसाइट्सचे नावही नमूद केले आहे. यासंदर्भात पीआयबीने नोटीस बजावली आहे. पीआयबी दिल्लीने अधिकृत वेबसाइट pib.gov.in वर जारी केलेल्या नोटीसनुसार, 'केंद्र सरकारच्या योजनांच्या नावांप्रमाणे बनावट वेबसाइट तयार करून उमेदवारांची फसवणूक केल्याचे केंद्रीय शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे. यामध्ये सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवले जात आहे. या वेबसाइट्सचा लेआउट मूळ सरकारी वेबसाइटसारखा बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कंटेंट, प्रेझेंटेशन या बाबतीत या बनावट वेबसाइट्सही बऱ्याच अंशी मूळ वेबसाइट्ससारख्या दिसतात. यानंतर या वेबसाइट्सवर विविध सरकारी नोकऱ्यांच्या रिक्त जागा, उच्च पगाराच्या जाहिराती दाखवल्या जात आहेत. एवढेच नव्हे तर उमेदवारांकडून सरकारी भरतीच्या नावाने अर्ज भरून घेतले जात असून शुल्क जमा करण्याचाही पर्याय उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. पण ही पदे खरी नाहीत. तसेच तुमचा अर्ज किंवा शुल्क सरकारी खात्यापर्यंत पोहोचत नाही. ही एक प्रकारची फसवणूक आहे. म्हणून वेबसाइट तपासल्याशिवाय नोकरीसाठी अर्ज करू नका आणि सावध राहा असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही सरकारी नोकरीच्या रिक्त पदांची माहिती मिळाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवर जाऊन तपशील पाहा. रोजगार वर्तमानपत्र तपासा. याशिवाय, तुम्ही संबंधित विभागाला ईमेल किंवा फोन करून चौकशी करून तुमच्या शंका दूर करू शकता असेही सांगण्यात आले आहे. तुम्ही अशा कोणत्याही बनावट वेबसाईट किंवा समाजकंटकांच्या जाळ्यात फसलात तर तुम्हाला प्रचंड आर्थिक नुकसान आणि मानसिक त्रास होऊ शकतो आणि याला तुम्ही स्वत: जबाबदार असाल, असा इशाराही सरकारकडून देण्यात आला आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/jCDNTxJ
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments