Also visit www.atgnews.com
करोना: ऑस्ट्रेलियातील चीनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर संक्रांत
सिडनी: ऑस्ट्रेलियातील टॉप विद्यापीठांनी चिनी विद्यार्थ्यांना विद्यापीठे सोडून जाण्याचा इशारा दिला आहे. विषाणूमुळे घातलेल्या प्रवासबंदीची मर्यादा वाढवल्यानंतर विद्यापीठांनी हे पाऊल उचचले आहे. येथील आठ टॉप रँक विद्यापीठांमधील या विद्यार्थ्यांच्या विविध सेमिस्टर लवकरच सुरू होणार आहेत. चीनच्या सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांनी येथे प्रवेश घेतले होते. पण त्यांना देशात येण्यास १ फेब्रुवारीपासून बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती या विद्यापीठांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गटाचे प्रमुख विकी थॉमसन यांनी दिली. 'आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना ते येथे कधी येऊ शकतील, याबाबतचे कोणतेही आश्वासन देऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थी येथे विद्यार्थी येणारच नाही असं वाटत आहे,' असं थॉमसन म्हणाले. पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी गुरुवारी जाहीर केले की प्रवास बंदी आणखी किमान एक आठवडा वाढवण्यात आली आहे. ब्रिटन, कॅनडा मधील टॉप युनिव्हर्सिटी चीनी विद्यार्थ्यांना खुल्या आहेत. चीनी विद्यार्थ्यांची संख्या गेले काही वर्षांत जगभरच्या विद्यापीठांमध्ये वाढत आहे. २०१७-१८ साली विदेशी शिक्षणाचा वाटा या टॉप विद्यापीठांमध्ये ३२.४ अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्स इतका होता. आता या विद्यार्थ्यांना लांब ठेवून ही टॉप विद्यापीठे या उत्पन्नातला २ अब्ज डॉलर्सच्या शुल्कावर पाणी सोडत आहेत. करोना विषाणूने आतापर्यंत १,४०० लोकांचे बळी घेतले आहेत, तर ६४ हजार लोकांना याची लागण झाली आहे. ऑस्ट्रेलियातदेखील शुक्रवारी सकाळपासून करोनाचे १५ रुग्ण आढळले आहेत. प्रवासबंदी असेपर्यंत चीनच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन कोर्सेसच्या माध्यमातून शिकता येईल का याबाबतची चाचपणी सुरू असल्याचे ऑस्ट्रेलियाचे शिक्षणमंत्री डॅन टेहान यांनी सांगितलं.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3bEqEsr
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments