जेईई, नीट, नेट परीक्षा आणखी लांबणीवर?

नवी दिल्ली: JEE Main, अॅडव्हान्स्ड, UG 2020, UGC-NET या आणि अशा अन्य सर्व स्पर्धा आणि प्रवेश परीक्षांवर देशातील लॉकडाउन स्थितीचा परिणाम झाला आहे. या परीक्षा याआधीच एप्रिलच्या मध्यापर्यंत लांबणीवर पडल्या होत्या; मात्र आता अनेक राज्यांनी काळ वाढवल्याने त्या आणखी लांबणीवर पडण्याची दाट शक्यता आहे. या परीक्षा लांबल्याने संबंधित अनेक पदवीपूर्व आणि पदव्युत्तर परीक्षांचे प्रवेशही रखडणार आहेत. जर लॉकडाऊन मेमध्ये उठवला तर हे प्रवेश जुलै-ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. दरम्यान, अद्याप देशातील सुमारे ३० विविध शिक्षण मंडळांच्या बोर्डाच्या परीक्षा पूर्ण व्हायच्या आहेत किंवा जेथे परीक्षा झाल्या आहेत, तेथे मूल्यांकन प्रक्रीया झालेली नाही. परिणामी या सर्व परीक्षांचे निकालही लांबणीवर पडणार आहेत. सीबीएसई, एनआयओएस आणि आयसीएसई बोर्डांनी त्यांच्या दहावी, बारावीच्या टाकल्या आहेत, ज्या परीक्षा झाल्या आहेत, त्यांच्या मूल्यमापन प्रक्रिया लांबणीवर पडल्या आहेत. हे सर्व बोर्ड १४ एप्रिलनंतरच्या परिस्थितीनुसार पुढील निर्णय जाहीर करणार आहेत. देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन स्थिती आहे, तर महाराष्ट्रासह काही राज्यांनी हा कालावधी ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे. केंद्रीय मनुष्यबळ विभागाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता परीक्षा आणखी लांबणीवर पडतील. या महिन्याच्या सुरूवातीला सीबीएसईने दहावी, बारावीची विषयसंख्या २९ वर आणली आहे. म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या एकूण ४१ विषयांची परीक्षा प्रलंबित होती, यापैकी केवळ २९ विषयांचीच परीक्षा घेतली जाणार असल्याचे सीबीएसईने जाहीर केले आहे. लॉकडाऊन वाढल्यास कदाचित या २९ परीक्षांचाही बोर्डाकडून नव्याने विचार केला जाऊ शकतो.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ek6iFW
via IFTTT

Post a Comment

0 Comments