जेएनयू, डीयूत प्रवेश घ्यायचाय?... अर्ज करा

नवी दिल्ली: दिल्ली विद्यापीठातील अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी DUET 2020 या परीक्षेचं आयोजन केलं जातं. याचप्रमाणे जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) मधील प्रवेशांसाठी JNUEE 2020 या परीक्षेचं आयोजन केलं जातं. या दोन्ही परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. जर तुम्ही आता बारावीची परीक्षा देत आहात आणि DU किंवा JNU मध्ये अॅडमिशन घ्यायचंय तर या प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकावर लक्ष ठेवा. जेएनयूमध्ये प्रवेश घ्यायची तुमची इच्छा असेल तर जेएनयूच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत आता काही दिवसांतच सुरू होणार आहे, याची नोंद घ्या. कदाचित बारावीच्या परीक्षेच्या गडबडीत तुम्ही या तारखा मिस्ड कराल. JNUEE 2020 Schedule प्रवेश अर्ज - २ मार्च २०२० प्रवेश अर्जाची अंतिम मुदत - ३१ मार्च २०२० अॅडमिट कार्ड - २१ एप्रिल २०२० परीक्षा - ११ ते १४ मे २०२० निकाल - ३१ मे २०२० DUET 2020 Schedule प्रवेश अर्ज - २ एप्रिल २०२० प्रवेश अर्जाची अंतिम मुदत - ३० एप्रिल २०२० अॅडमिट कार्ड - १५ मे २०२० परीक्षा - २ ते ९ जून २०२० निकाल - २५ जून २०२०


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/37fnKGV
via IFTTT

Post a Comment

0 Comments