इस्रोत १८२ पदांवर भरती; पाहा काय आहे पात्रता

बेंगळुरू: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने () आपल्या अधिकृत संकेतस्थळावरून संस्थेतील विविध पदांवरील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार ६ मार्च २०२० पर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतील. एकूण रिक्त पदे १८२ आहेत. अर्ज करण्यासाठी इस्रोच्या isro.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देता येईल. या रिक्त पदांमध्ये फिटर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, टर्नर, मोटर व्हेइकल मेकॅनिक, वेल्डर आदी पदांचा समावेश आहे. कुक आणि ड्रायव्हर या पदांसाठी तर आवश्यक शैक्षणिक पात्रता केवळ दहावी उत्तीर्ण आहे. सर्व पदांची भरती लेखी परीक्षा आणि स्कील टेस्टच्या आधारावर करण्यात येणार आहे. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे. अर्ज केल्यानंतर उमेदवारांना स्क्रीनिंगसाठी बोलावलं जाईल. लेखी परीक्षेचं आयोजन केवळ बेंगलुरू येथे होणार आहे. लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड होईल. स्कील टेस्ट केवळ क्वालिफाइंग नेचरचं असेल, यात ६० टक्के गुण मिळणं गरजेचं आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38AyUHU
via IFTTT

Post a Comment

0 Comments