परीक्षेचं टेन्शन आलंय?...'या' सोप्या गोष्टी करा

मुंबई: परीक्षांचा मोसम सुरू झाला आहे. घराघरातलं वातावरण यामुळे थोडं टेन्स झालं आहे. टीव्हीचे आवाज मंदावू लागले आहेत. मुलांना या वातावरणामुळे, सततची नकारात्मकता, इतरांशी तुलना, अभ्यासाची काळजी या गोष्टींमुळे उगीचच ताण येतो. हा परीक्षेचा ताण घ्यायचा नसेल, तर काही सोप्या गोष्टी फॉलो करा... > सर्वप्रथम स्वत:मध्ये सकारात्मकता आणा. > परीक्षा काहीतरी मोठे संकट आहे, हे आधी मनातून काढून टाका. > आपल्या दिनक्रमात बदल करू नका. > वेळेचे नियोजन करा. > इतरांबरोबर स्वत:ची तुलना करू नका. > पालकांनीही आपल्या पाल्याची तुलना इतर मुलांशी करू नये. > पालकांनी सतत अभ्यास कर असे टुमणे लावू नये. > आधीच्या अपयशाचा विचार मनातून काढून टाका. > कोणत्या विषयाची भीती वाटते ते शोधा. त्या विषयातले सोपे सोपे प्रश्न आधी अभ्यासा. > योग्य आहार घ्या. पुरेशी झोप घ्या. > आपल्या पालकांशी संवाद साधा. > एकावेळी एकाच विषयाच्या अभ्यासाचा विचार करा. > अभ्यासातून मध्ये थोडा ब्रेक घेऊन आवडीचे काम करा. जसे- गाणे ऐकणे, चित्र काढणे इत्यादी. > जमल्यास योगा करा, ओंकार म्हणा.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/38jlPm2
via IFTTT

Post a Comment

0 Comments