Also visit www.atgnews.com
१०५ वर्षांच्या आजीबाई झाल्या चौथी पास!
तिरुवनंतपुरम: शिक्षणाला वय नसतं याचा उत्तम दाखला केरळातल्या आज्जीबाईंनी दिला आहे. १०५ वर्षे वयाच्या भागीरथी अम्माने चौथीची परीक्षा उर्तीर्ण केली आहे! केरळ राज्य शिक्षा अभियानाच्या माध्यमातून घेत असलेल्या वर्गांत भागीरथी आजी सर्वाधिक वयाच्या विद्यार्थिनी आहेत. विशेष म्हणजे आजीने ७४.५ टक्के इतके दणदणीत मार्क मिळवले आहेत!! आजींची उमेद आता अधिक वाढली आहे, त्यांना दहावी स्तराची परीक्षा द्यायची आहे! अलीकडेच केरळ राज्य साक्षरता मिशनच्या अधिकाऱ्यांनी भागीरथी आजींचा त्यांच्या घरी जाऊन गौरव केला. भागीरथी आजींना सहा मुले आणि १६ नातवंडे आणि १२ पतवंडे आहेत! याबाबतचे वृत्त देणाऱ्या एएनआय वृत्तसंस्थेला केरळ राज्य साक्षरता मिशनचे जिल्हा समन्वयक सी. के. प्रदीप कुमार यांनी माहिती दिली. प्रदीप कुमार म्हणाले, 'अम्माला ७४.५ टक्के गुण मिळाले आहेत. अम्मांचं उदाहरण इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.' वयाच्या नवव्या वर्षी भागीरथी आजींची आई वारल्यानंतर त्यांनी भावंडांचा सांभाळ करण्यासाठी तिसरीत शिक्षण अर्धवट सोडले. नंतर शिकायचे राहून गेले. वय वाढलं, संसाराच्या जबाबदाऱ्या वाढल्या, त्यात शिकण्याचं वय पार मागे पडलं पण आजींनी या वयातही शिकण्याची उमेद सोडली आहे. आजीबाईंच्या दाताचं बोळकं झालेलं, नजर कमजोर झालेली असतानाही त्यांनी या साक्षरता अभियानांतर्गत नव्याने श्रीगणेशा गिरवला. इयत्ता चौथीच्या काठिण्य पातळीची परीक्षा घेण्यात आली. ६ फेब्रुवारीला परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मल्याळम, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित अशा विविध विषयांची परीक्षा घेण्यात आली. त्यात त्यांना २७५ पैकी २०४ गुण मिळाले! केरळ राज्य साक्षरता मिशनच्या संचालक पी. एस. श्रीकला यांनी भागीरथी अम्मांच्या घरी जाऊन त्यांचा गौरव केला.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2ubsAYs
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments