Also visit www.atgnews.com
SBI क्लर्क परीक्षा ८ मार्च रोजी, अॅडमिट कार्ड आले
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्युनिअर असोसिएट आणि सेल्स पदांसाठी आयोजित केलेल्या परीक्षेचे अॅडमिट कार्ड आले आहे. ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला आहे, त्यांनी हे अॅडमिट कार्ड बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करावेत. परीक्षा ८ मार्च २०२० रोजी होणार आहे. ही जम्बो भरती असून वरील दोन्ही पदांसाठी देशभरातील एसबीआय बँक शाखांमध्ये एकूण ८ हजार जागा रिक्त आहेत. महाराष्ट्रात यापैकी ८६५ जागांवर भरती होणार आहे. उमेदवार आपले अॅडमिट कार्ड ८ मार्चपर्यंत डाऊनलोड करू शकतात. यावर परीक्षेची तारीख, परीक्षा केंद्राचा पत्ता, वेळ आदी माहिती असेल. ८ मार्च रोजी पूर्व परीक्षा होणार आहे. यात उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षेकरिता बोलावले जाईल. मुख्य परीक्षा १९ एप्रिल रोजी होणार आहे. मुख्य परीक्षेचे अॅडमिट कार्ड परीक्षेपूर्वी दोन आठवडे आधी येतील. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की हे अॅडमिट कार्ड पोस्टाने वा अन्य कोणत्या प्रकारे तुमच्यापर्यंत येणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला ते संकेतस्थळावरूनच घ्यावे लागतील. .co.in या बँकेच्या वेबसाइटवर त्यासाठी लॉगइन करावे लागेल. पूर्व परीक्षा ऑनलाइन असेल. यात १०० प्रश्न विचारण्यात येणार असून प्रत्येक प्रश्नासाठी १ गुण असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण कापला जाणार आहे. परीक्षेत तीन विभाग असतील. प्रत्येक विभागासाठी २० मिनिटे कालावधी असेल. इंग्रजी भाषा (३० गुण), न्युमरिकल अॅबिलिटी (३५ गुण) आणि रिझनिंग अॅबिलिटी (३५ गुण) अशा तीन प्रकारच्या प्रत्येकी २० मिनिटांच्या चाचण्या असतील.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2SkOBNN
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments