Also visit www.atgnews.com
UPSC मुलाखतीत बाद होऊनही नोकरी; मोदी सरकारच्या योजनेने संजीवनी?
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससीच्या नागरी सेवा परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेऊनही काहींच्या पदरी निराशा पडते. मुलाखतीपर्यंत जाऊन अपेक्षित गुण न मिळाल्याने पुन्हा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा असा प्रवास करावा लागतो. पण मुलाखतीत अपयशी ठरलेल्या उमेदवारांसाठी मोदी सरकारने नवी योजना आणली, ज्याचा फायदा सध्या हजारो उमेदवारांना होत आहे. मुख्य परीक्षेतील गुणांच्या आधारावर मुलाखतीत बाद झालेल्या उमेदवारांना खाजगी क्षेत्रात मोठ्या पदांवरील नोकऱ्या मिळत आहेत. गेल्या दोन वर्षात यात १६५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यूपीएससीची नागरी सेवा परीक्षा आणि भारतीय अभियांत्रिकी सेवा (आयईएस) या परीक्षेत चांगले गुण मिळवले, पण अंतिम यादीत नाव आलं नाही अशा विद्यार्थ्यांना संपर्क साधण्याची परवानगी २०१७ मध्ये मोदी सरकारकडून खाजगी कंपन्यांना देण्यात आली. या दोन्ही परीक्षेच्या मुलाखतीपर्यंत मजल मारली, पण अंतिम निवड झाली नाही अशाच विद्यार्थ्यांसाठी ही तरतूद आहे. या उमेदवारांना त्यांचे गुण यूपीएससीच्या एकात्मिक माहिती प्रणालीवर अपलोड करण्याचा पर्याय देण्यात येतो. या आधारावर कोणतीही खाजगी कंपनी गुण पाहून संबंधित विद्यार्थ्याला नोकरी देऊ शकते. ‘द प्रिंट’च्या वृत्तानुसार, २०१७ मध्ये ८०० विद्यार्थ्यांनी या प्रणालीवर आपली माहिती दिली. यापैकी २०० विद्यार्थ्यांना खाजगी क्षेत्रात नोकरी मिळाली. २०१८ मध्ये यामध्ये प्रचंड वाढ झाली. एकूण ६ हजार विद्यार्थ्यांनी आपली माहिती यूपीएससीच्या प्रणालीवर दिली, ज्यातून ५०० उमेदवारांना खाजगी नोकरी मिळाली. विशेष म्हणजे २०१९ मध्ये या प्रणालीवर १४ हजारपेक्षा जास्त उमेदवारांनी खाजगी नोकरीसाठी आपली माहिती दिली आहे. यूपीएससीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘द प्रिंट’ला दिलेल्या माहितीनुसार, मुलाखतीला पात्र ठरलेल्या एकूण ८० ते ९० टक्के विद्यार्थ्यांनी हा पर्याय निवडला आहे. विशेषतः इंजिनीअर आणि डॉक्टर असलेले उमेदवार हा पर्याय निवडत असून त्यांना खाजगी क्षेत्रात नोकरीही मिळत आहे, असंही या अधिकाऱ्याने सांगितलं.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2HgU41S
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments