Also visit www.atgnews.com
UPSC परीक्षेचे अर्ज भरायला आजपासून सुरुवात
नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) च्या नागरी सेवा परीक्षांचे नोटिफिकेशन जारी झाले आहे. आज, बुधवारपासूनच अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर .gov.in वर जाऊन या परीक्षेसाठी नोंदणी करता येईल. अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३ मार्चपर्यंत आहे. भारतीय प्रशासकीय आणि अन्य सेवेतील ७९६ पदांसाठी ही भरती होत आहे. कोण करू शकतं अर्ज? केवळ पदवीधर उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यात यूपीएससीची प्रक्रिया पार पडते. मुख्य परीक्षा १,७५० गुणांची असते तर मुलाखतीसाठी २७५ गुण असतात. मुख्य परीक्षा आणि मुलाखतीतीली गुणांच्या आधारे उमेदवार निवडले जातात. यूपीएससी परीक्षेद्वारे भारतीय प्रशासकीय सेवा (), भारतीय पोलीस सेवा () आणि भारतीय परराष्ट्र सेवा (), रेल्वे गट ए, भारतीय टपाल सेवा, इंडियन ट्रेड सर्व्हिसेस सह अन्य सेवांसाठी नोकरभरती केली जाते. असा करा अर्ज - १) UPSC च्या संकेतस्थळावर upsconline.nic.in येथे जा. २) ONLINE APPLICATION FOR VARIOUS EXAMINATIONS OF UPSC या लिंकवर क्लिक करा. ३) Click Here for PART I असे लिहिले असेल तेथे क्लिक करा. ४) सर्व सूचना काळजीपूर्व वाचून नंतर YES वर क्लिक करा. ५) नाव, जन्मतारीख, आई-वडिलांचं नाव, शैक्षणिक पात्रता, पत्ता आदि सर्व विचारलेली माहिती भरा आणि सबमीट करा. ६) शुल्क ऑनलाइन भरा. ७) परीक्षा केंद्र निवडा. ८) फोटो, स्वाक्षरी, ओळखपत्राची कॉपी अपलोड करा. ९) भाग १ अॅक्सेप्ट झाल्यानंतर भाग २ साठी नोंदणी करा.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2HiK9IR
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments