लॉकडाऊन: AICTE ने दिले इंटर्नशीपचे 'हे' निर्देश

देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतांश लोक घरातून काम करत आहेत. पण केवळ नोकरीच नव्हे तर इंटर्नशीपची संधीही घरी बसून अनेकांना मिळाली आहे. ज्या कंपन्यांनी इंटर्नशीपची संधी उमेदवारांना दिली आहे, त्यांनी त्यांच्याकडून ती इंटर्नशीप घरून करून घ्यावयाची आहे, असे अर्थात अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे निर्देश आहेत. नेमकं काय ते समजून घ्या... ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) ने सर्व संबंधित कॉलेजांकरिता एक नोटीस जारी केली आहे. यात इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असणाऱ्या इंटर्नशीपबद्दलचे नियम एआयसीईटीने स्पष्ट केले आहेत. या नोटीसमध्ये असं म्हटलंय की 'करोना व्हायरसमुळे राष्ट्रव्यापी लॉकडाऊनच्या परिस्थितीत सर्वांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे अनिवार्य आहे. या अनुषंगाने केंद्र आणि राज्य सरकार देत असलेले सर्व निर्देश पाळावेत. या अनुषंगाने विद्यार्थ्यांना हे स्पष्ट करण्यात येते की अशी कोणतीही इंटर्नशीप करू नका, ज्यात प्रवास करावा लागत असेल किंवा लोकांना भेटावं लागत असेल.' एआयसीटीईने पुढे असंही स्पष्ट केलं आहे की 'जे इंटर्नशीप करत आहेत आणि कंपनीने त्यांना घरून काम करण्याची सुविधा दिली आहे, त्यांनी ती इंटर्नशीप सुरू ठेवावी. मात्र अद्याप ज्यांनी कोणतीही इंटर्नशीप केली नसेल, त्यांनी घराबाहेर पडू नये. घरी बसल्या बसल्या जर इंटर्नशीप मिळत असेल तर ते पाहावे. विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्ट्या गुंतवून ठेवण्यासाठी महाविद्यालयांनी त्यांना आव्हानात्मक टास्क द्यायला हवेत. या टास्कवर विद्यार्थी घरबसल्या काम करू शकतात.' जेव्हा परिस्थिती सामान्य होईल तेव्हा काउन्सिल पुढील नवे आदेश जारी करेल, असेही AICTE ने स्पष्ट केले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2WOnAVx
via IFTTT

Post a Comment

0 Comments