दहावी परीक्षा: पेपरला जाताना 'या' वेळा पाळा

मुंबई: दहावीची राज्य मंडळामार्फत घेण्यात येणारी परीक्षा मंगळवार ३ मार्चपासून सुरू होत आहे. सकाळच्या सत्रातला पेपर ११ वाजता सुरू होणार आहे. मात्र तत्पूर्वी परीक्षा केंद्रात हजर राहणे आवश्यक आहे. कोणत्या वेळा महत्त्वाच्या? - परीक्षा कक्षात परीक्षेच्या वेळेआधी अर्धा तास अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे (उदाहरणार्थ, सकाळच्या सत्रात सकाळी १०.३० वाजता आणि दुपारच्या सत्रात दुपारी २.३० वाजता.) - विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे वाचन व आकलन होण्यासाठी प्रश्नपत्रिका नियोजित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर दिली जाते. त्यामुळे वेळेत परीक्षा केंद्रात हजर असाल, तर तुमची कोणत्याही प्रकारची घाई होणान नाही. - विद्यार्थ्यांनी हॉलतिकिट व उत्तरपत्रिकेवरील सूचनांचे काटेकोर पालन करावे. - उत्तरपत्रिका आणि पुरवण्या यांची अदलाबदल होऊ नये यासाठी सर्व उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांवर बारकोडची छपाई करण्यात आली आहे, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. हेल्पलाइन क्रमांक पुणे - ९४२३०४२६२७मुंबई - (०२०) २७८८१०७५ / २७८९३७५६नागपूर - (०७१२) २५६५४०३ / २५५३४०१औरंगाबाद - (०२४०) २३३४२२८ / २३३४२८४ / २३३१११६कोल्हापूर - (०२३१) २६९६१०१ / २६९६१०२ / २६९६१०३अमरावती - (०७२१) २६६२६०८नाशिक - (०२५३) २५९२१४१ / २५९२१४३लातूर - (०२३८२) - २५१६३३कोकण - (०२३५२) - २२८४८० या व्यतिरिक्त राज्य मंडळ स्तरावर ०२० - २५७०५२७१ आणि ०२० - २५७०५२७२ हे हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/388mg1O
via IFTTT

Post a Comment

0 Comments