केंद्रीय विद्यालयांमध्ये पहिली ते ८ वी विद्यार्थी प्रमोट होणार

नवी दिल्ली: देशातील सर्व केंद्रीय विद्यालयांमधील पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्याना पुढच्या वर्गात प्रमोट केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असो वा नसो, सर्व विद्यार्थ्यांना प्रमोट केले जाणार आहे. एका अधिकाऱ्यांनी सांगितले की संघटनेने हा निर्णय घेतला की पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणाशिवाय परीक्षा देता आली नसेल त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमोट करून वरच्या वर्गात पाठवले जाणार आहे. व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्चपर्यंत केंद्रीय विद्यालये आणि अन्य सर्व केंद्रीय विद्यालयांच्या परीक्षा आणि वर्ग स्थगित केले आहेत. सर्वात आधी उत्तर प्रदेश या राज्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याची घोषणा केली होती. यूपीनंतर महाराष्ट्रातही हा निर्णय घेण्यात आला. हरयाणातही हा निर्णय घेण्यात आला. मध्य प्रदेशात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या मासिक आणि अर्धवार्षिक परीक्षांच्या आधारावर मूल्यांकन करून वरच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. गुजरातमध्ये पहिली ते नववीपर्यंतच्या आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केले जाणार आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/33K1zsh
via IFTTT

Post a Comment

0 Comments