Also visit www.atgnews.com
करोनाला हरवण्याची कल्पना सुचवणाऱ्याला ४२ लाख इनाम!!
करोना व्हायरसपुढे अख्ख्या जगाने गुडघे टेकले आहेत. भारत लॉकडाऊन स्थितीत आहे. भारतासह संपू्र्ण जग या महामारीवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे. याच दरम्यान, भारतात केंद्र सरकारकडून देशवासियांना एक आवाहन करण्यात आलं आहे, खरं तर आवाहनापेक्षा एक आव्हानच आहे हे. करोनावर मात करण्याची कल्पना सुचवा आणि इनाम जिंका!! ही आयडियाथॉन २७ आणि २८ मार्च रोजी होणार आहे. Fight Corona असं या आयडियाथॉनचं नाव आहे. हे एक ओपन चॅलेंजच आहे म्हणा ना. एआयसीटीई म्हणजेच ऑल इंडिया काउंसिल फॉर टेक्निकल एजुकेशन आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय यांनी एकत्रितपणे हे चॅलेंज सुरू केलं आहे. ज्यांच्या कल्पनांची निवड होईल त्यांना ४२ लाखांपर्यंतचे इनामही आहे. काय आहे करोना आयडियाथॉन? ही आयडियाथॉन २७ आणि २८ मार्च २०२० रोजी आयोजित केली जाणार आहे. या दोन दिवशी, आलेल्या एन्ट्रीजचे परीक्षण केले जाईल. करोना व्हायरसशी मुकाबला करणारी कोणती आयडिया किती प्रभावी त्यावर चर्चा होईल आणि प्रत्येक मुद्द्याची समीक्षा केली जाईल. जोपर्यंत बेस्ट सोल्युशनवाली आयडिया निवडली जाणार नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील. सर्वात चांगल्या आयडियाला रोख इनाम मिळेल. काय आहे इनाम? द्वारे विनिंग आयडिया देणाऱ्या विद्यार्थ्याला, शिक्षणतज्ज्ञाला दोन लाख रुपये रोख इनाम मिळेल. याव्यतिरिक्त ज्यांची सर्वोत्तम आयडिया निवडली जाईल त्यांना ४० लाख रुपयांपर्यंतची ग्रान्टही दिली जाईल.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2UBYerb
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments