Also visit www.atgnews.com
दहावी, बारावी परीक्षा नेमकी कधी? शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी 'सीबीएसई'च्या दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा () जाहीर केल्या आहेत. यानंतर राज्य शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी दहावीची परीक्षा ३ मेनंतर आणि बारावीची परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. करोनामुळे यंदा शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कोलमडले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. तर, मुंबई आणि परिसर वगळता राज्यातील इतर भागात नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या, तरी विद्यार्थी आणि पालकांचे परीक्षा कधी होणार, याकडे लक्ष होते. या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा तीन मेनंतर आणि बारावीची परीक्षा पंधरा एप्रिलनंतर घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती शिक्षणमंत्र्यांनी दिली. त्याचप्रमाणे पाचवी ते आठवीपर्यंत शाळा सुरू करण्यासंदर्भात आणखी काही दिवस परिस्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच, राज्यातील करोनाची परिस्थिती आणि सार्वजनिक आरोग्य विभागाकडून माहिती घेऊनच शाळा सुरू करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. मुंबई-पुणे व्यतिरिक्त अनेक भागांमध्ये शाळा सुरू झाल्याचेही त्यांनी या वेळी नमूद केले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2LfnAKs
via IFTTT
Also visit www.atgnews.com
Career News in Marathi: Career News
मराठी Career बातम्या | Maharashtra Times
Post a Comment
0 Comments