शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन करोनाविरुद्धच्या लढ्याला

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळांने करोनाग्रस्तांना मदत म्हणून २१ लाख रुपयांचा निधी दिला आहे. सीबीएसईच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे वेतन स्वेच्छेने करोनाग्रस्तांसाठी दिले आहे. हे पैसे बोर्डाने पंतप्रधान मदत निधीत दिले आहेत. याबाबतचं प्रसिद्धीपत्रक बोर्डाने जाहीर केलं आहे. यात सीबीएसई बोर्डाचे सचिव अनुराग त्रिपाठी म्हणाले, 'ए गटातल्या कर्मचाऱ्यांनी आपले दोन दिवसांचे वेत तर बी आणि सी गटातील कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचं वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीला दिलं आहे.' करोना विषाणूचा फैलाव भारतात सुरू आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनही घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर विविध क्षेत्रातील लोक करोनाग्रस्तांसाठी मदत म्हणून सरकारला यथाशक्ती मदत करत आहेत. याचाच एक भाग म्हणून सीबीएसईच्या शिक्षक, कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला. राज्यातल्या शिक्षकांनीही दिले एक दिवसाचे वेतन करोनाग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्र विद्यापीठ आणि महाविद्यालये शिक्षक संघटना अर्थात एमफुक्टोने आपले एक दिवसाचे वेतन निधी म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. एमफुक्टोच्या अध्यक्ष डॉ. तपती मुखोपाध्याय यांनी हे जाहीर केले आहे. हे योगदान मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आले आहे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2wFn2H0
via IFTTT

Post a Comment

0 Comments