UPSCची NDA, NA परीक्षा २०२० लांबणीवर

केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने एनडीए आणि एनए परीक्षा २०२० लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. कोव्हिड - १९ च्या संसर्गामुळे आलेल्या महामारीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यापूर्वी एनडीए आणि एनए परीक्षा १९ एप्रिला २०२० रोजी होणार होती. ही परीक्षा आता अनिश्चित काळापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. NDA/NA परीक्षा लष्कर, नौदल आणि हवाईदलातील भरतीसाठी घेतली जाते. २ जानेवारी २०२१ रोजी एनडीएचा १४५ वा कोर्स आणि भारतीय नौदलाचा १०७ वा कोर्स सुरू होणार आहे. त्यासाठी ही परीक्षा पार पडली. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया ८ जानेवारी रोजी सुरू झाली होती. ऑनलाइन अॅप्लिकेशन भरण्याची मुदत २८ जानेवारी २०२० पर्यंत होती. परीक्षांच्या नव्या तारखा यूपीएससी लवकरच जाहीर करणार आहे. संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर ही माहित देण्यात येईल. उमेदवारांनी यूपीएससी च्या संकेतस्थळावर सर्व अपडेट्स चेक करीत राहावे.


from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2JovBZx
via IFTTT

Post a Comment

0 Comments